Manasvi Choudhary
व्हॉट्सअॅप हे जगाभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मॅसेन्जिंग प्लॅटफॉर्म आहे.
व्हॉट्सअॅपच्या फिचर्स आणि सेटिंग्समध्ये विविध बदल होत असतात. ज्याबद्दल युजर्संना माहिती नसते.
व्हॉट्सअॅपवर पाठवलेला मॅसेज पाहिल्याचे समोरच्याला कळू नये यासाठी एक सोपी पध्दत आहे.
ज्यावेळेस व्हॉट्सअॅपवरती तुम्ही एखाद्याला मॅसेज करता तेव्हा एक टिक दिसते. मॅसेज पोहोचताच ती डबल टिकमध्ये बदलते.
तुम्ही पाठवलेला मेसेज समोरच्याने पाहताच डबल टिक ब्ल्यू होते. याचाच अर्थ असा की मेसेज समोरच्या व्यक्तीने वाचला आहे.
मॅसेज वाचल्यानंतरही ब्ल्यू टिकमार्क समोरच्या व्यक्तीला दिसू नये यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप फिचर्समध्ये सेटिंग करू शकता.
तुमच्या व्हॉट्सअॅप सेटिंगमध्ये बदल करा. त्यासाठी व्हॉट्सअॅप फिचर्सच्या सेटिंगमध्ये जा.
सेटिंगमध्ये अनेक पर्याय असतील. त्यापैकी प्रायव्हसीवर क्लिक करा. यानंतर रिड रिसीप्टवर क्लिक करा.
रिसीप्ट हा पर्याय तुम्हाला बंद करावा लागेल. ज्यामुळे मेसेज वाचल्यानंतर ब्ल्यू टिक दिसणार नाही.
रिड रिसीप्ट पर्यायाचा वापर केल्यास काही तोटे आहेत. यामुळे महत्वाच्या मेसेजकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.
तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहिल्यानंतर त्याला कळणार नाही. यासाठी देखील व्हॉट्सअॅप फिचर्समध्ये सेटिंगचा पर्याय आहे.
व्हॉट्सअॅप स्टेटस दिसू नये हे फिचर्स वापरल्यानंतर तुम्ही एखादे स्टेटस सेट केल्यावर तुमचे स्टेटस कोणीच पाहू शकणार नाही.