ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या काळात प्रत्येक लहान मुलांना शाळेतून आल्यावर मोबाईल वापरण्याची प्रंचड वाईट सवय लागलेली आहे.
त्यामुळे आम्ही सांगत असलेल्या ट्रिक तुम्हीही ट्राय करून पहा.
सध्या बाजारात लहान मुलांसाठी छान- छान गोष्टीचे पुस्तक मिळतात,ज्यातून त्यांना वाचण्याची गोडी लागते.
त्यांना घरातील लहान काम असतील ते करण्याची सवय लावणे.
आपणच मुलांसोबत बसून चेस किंवा साप सीधीसारखे बुध्दीला चालना आणि विरंगुळा देणारे गेम खेळावे.
आपल्या मुलांना त्यांना आवडणाऱ्या गोष्टी करून द्यावत जेणेकरून ते एका गोष्टीत हुशार होतील.
आवडते गाणे जर ऐकले तर मन प्रसन्न होते इतर कामात ही मन लागते.
लहान मुलांना एक्सपरिमेंट करण्याची आवड असते,त्यामुळे लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टी देऊन एक्सपरिमेंट करून द्यावे.