Shraddha Thik
अनेक वेळा जेवताना किंवा कोणाशी बोलत असताना अचानक आपली जीभ चावली जाते. जेव्हा असे होते तेव्हा तीव्र वेदना जाणवते आणि काहीही खाण्यास आणि पिण्यास त्रास होतो.
जर तुमची जीभ कापली गेली तर तुम्ही लगेच बर्फ लावू शकता. बर्फाच्या तुकड्यांच्या मदतीने जखम भरून येण्यास मदत होईल आणि वेदनाही कमी होतात.
बोलताना किंवा खाताना जीभ कापली तर लगेच दह्याचे सेवन करा. हे थंड आहे, ज्यामुळे जखमा आणि वेदना कमी होतात.
जीभ चावल्यास तुम्ही मधाचे सेवन करू शकता. यामुळे दुखण्यापासून त्वरित आराम मिळू शकतो. याशिवाय जखमाही कमी होतात.
कापलेल्या जिभेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही थंड दुधाचे सेवन करू शकता. यामध्ये असलेले गुणधर्म दुखण्यापासून आराम देण्याचे काम करतात.
ही प्रक्रिया दिवसातून 4 ते 5 वेळा केल्याने तोंडातील जखम भरुन येण्यास जास्त कालावधी लागणार नाही आणि त्यावरील बॅक्टेरीया देखील निघून जातील.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक तपशीलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.