Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

Lavani Swarotsav: लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त ‘सोळावं वरीस धोक्याचं’ हा लावणी स्वरोत्सव 13 मार्च रोजी विलेपार्लेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात रंगणार आहे.
Sulochana Chavan Lavani Swarotsav
Sulochana Chavangoogle
Published On

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त 'सोळावं वरीस धोक्याचं' हा अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार आहे. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटयगृहात शुक्रवार 13 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता हा सांगीतिक सोहळा होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा स्वरोत्सव होत आहे.

Sulochana Chavan Lavani Swarotsav
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या निमित्ताने लावणी परंपरेचा सुवर्ण ठेवा जपणाऱया सुलोचना चव्हाण यांच्या कलास्मृतींना अभिवादन केले जाणार आहे. सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगताप यांच्या सुरेल आवाजात लावण्या सादर करणार आहेत. निवेदन परेश दाभोळकर यांचे असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com