Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?
सध्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. कामाच्या ताणामुळे खूप थकवा येतो. त्यामुळे अनेकांना लवकर उठणं शक्य होत नाही. त्याचसोबत लवकर उठून व्यायाम करणं शक्य होत नाही. याने तुमच्या मेंदूवर, पचनसंस्थेवर आणि तुमच्या ह्रदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पण कमी झोप घेतल्याने तुम्हाला Heart Attack च्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. फक्त इतकंच नाहीतर तुमच्या रोजच्या चुकीमुळे हार्ट अटॅक येण्याआधी २४ ते ४८ तासात तुम्हाला काही गंभीर लक्षणं दिसू शकतात. जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
हार्ट अटॅकमुळे जगभरात अनेक रुग्ण त्यांचा जीव गमावतायेत. चुकीच्या सवयींमुळे त्यांच्या ह्रदयांचं नुकसान होतंय हे त्यांना फार उशीराच कळतं. काहींना वाटतं हार्ट अटॅक अचानक येतो. पण डॉक्टरांच्या मते शरीर काही तासांपूर्वी किंवा २४ ते ४८ तास आधी काही संकेत देतं. तेव्हा हृदयाच्या स्नायूं पर्यंत जाणारा रक्तप्रवाह अचानक अडथळ्यामुळे कमी होतो किंवा थांबतो. कधीकधी रक्तवाहिन्यांमध्ये प्लॅक साचल्यामुळे आणि त्यातून रक्ताचा गाठी तयार झाल्यामुळे हा अडथळा निर्माण होतो.
हार्ट अटॅक येण्याच्या २४ ते ४८ तास आधी शरीरात अनेक बदल सुरू होतात. यावेळेस रक्तवाहिन्या आणखी अरुंद होतात, सूज येते, हृदयाला जाणारा रक्तप्रवाह कमी-जास्त होतो आणि ऑक्सिजनही कमी होऊ शकतं.
रुबी हॉल क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. अभिजित खडतरे यांच्या मते, हार्ट अटॅक येण्याच्या काही तास आधी आणि विशेषतः महिलांमध्ये ही लक्षणं जास्त दिसतात. कोणतंही जड काम न करता सुद्धा शरीर पूर्णपणे थकलेलं वाटतं हे हृदय योग्य प्रकारे रक्त पंप करू शकत नसल्याचं लक्षण असतं.
छातीत दुखतं, जळजळ वाढते, अपचन जाणवतं, श्वास घेताना त्रास होतो, झोप येत नाही, अस्वस्थ वाटतं, टेन्शन येतं, पोट फुगतं, मळमळ, अपचन किंवा वरच्या पोटात दुखतं यांसारखी लक्षणे दिसतात. अनेकदा ही लक्षणे गॅस किंवा पचनाच्या समस्येसारखी वाटतात, पण यानेच तुमचा मृत्यू जवळ आलाय असं कळतं. पण तुम्ही वेळीच लक्षणं ओळखून त्यावर उपचार करुन तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा जीव वाचवू शकता.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

