Sakshi Sunil Jadhav
आजकाल कामाच्या ताणामुळे अनेकांना केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे अनेकजण केमिकल डायऐवजी नैसर्गिक उपाय शोधत असतात. पुढे आपण एक सोपी ट्रिक जाणून घेणार आहोत.
चुकीची जीवनशैली, झोपेची कमतरता आणि पोषणाचा अभाव यामुळे अनेकांच्या केसांमध्ये अकाली पांढरेपणा दिसू शकतो.
केमिकल हेअर डायमुळे केस आणि स्काल्पला त्रास होऊ शकतो, त्यामुळे अनेकजण नैसर्गिक आणि केमिकल-फ्री पर्याय शोधत असतात.
काही लोक कंडिशनरमध्ये कॉफी किंवा कोको पावडर मिक्स करुन केसांवर लावतात. याने केसांचा रंग नॅचरली गडद दिसू शकतात.
कॉफी आणि कोको पावडर नैसर्गिकरित्या गडद रंगाचे असल्यामुळे केसांच्या वरच्या थरावर हलका रंग जमा होतो आणि केस थोडे डार्क ब्राउन दिसू शकतात.
एका बाऊलमध्ये कंडिशनर घेऊन त्यात कॉफी पावडर किंवा कोको पावडर मिक्स करा. हे मिश्रण चांगले ढवळून पेस्टसारखे तयार करा.
केस आधी हलक्या शॅम्पूने धुवा. नंतर तयार केलेले मिश्रण मुळांपासून केसांच्या टोकापर्यंत लावा आणि सुमारे 20-30 मिनिटे तसेच ठेवा.
तज्ज्ञांच्या मते हा उपाय वापरण्यापूर्वी केसांच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करावी, जेणेकरून स्काल्पला कोणतीही अॅलर्जी होत नाही याची खात्री करता येईल.