Pune Porsche Case : पोलिसांना गुंगारा देऊन लुधियाना ते मुंबई प्रवास; क्राइम ब्रँचने मास्टरप्लान आखला, शिवानी अग्रवाल अडकली जाळ्यात

Pune Porsche Accident Case : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज शिवानी अग्रवालची चौकशी होणार आहे.
पोलिसांना गुंगारा देऊन लुधियाना ते मुंबई प्रवास; क्राइम ब्रँचने मास्टरप्लान आखला, शिवानी अग्रवाल अडकली जाळ्यात
Pune Porsche AccidentSaam TV

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे पोर्शे अपघात प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबाला अटक केली आहे. त्यानंतर आरोपी मुलाच्या आईलाही पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाची आई गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फिरत होती. मात्र, पुणे पोलिसांनी मास्टरप्लान आखत तिच्या मुसक्या आवळल्या.

पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. मात्र, रक्त्याच्या नमुन्यात फेरफार झाल्याची माहिती समोर आली. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल ही संशियत आरोपी आहे. फेरफार करण्यात आलेले रक्ताचे नमुने मुलाची आई शिवानी अग्रवालचे आहे, असाही संशय व्यक्त करण्यात आला. याचदरम्यान, शिवानी अग्रवाल गायब झाल्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालचा शोध सुरु केला.

पोलिसांना गुंगारा देऊन लुधियाना ते मुंबई प्रवास; क्राइम ब्रँचने मास्टरप्लान आखला, शिवानी अग्रवाल अडकली जाळ्यात
Ajit Pawar Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया

शिवानी अग्रवालला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मास्टरप्लान आखला. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून शिवानी पुणे पोलिसांना गुंगारा देत होती. शिवानी अग्रवाल सुरुवातीला लुधियाना त्यानंतर मुंबईमध्ये फिरत होती. पोलिसांना शोध लागू नये, यासाठी मोबाईल बंद ठेवून तिचा चकवा द्यायचा प्रयत्न सुरु होता. शिवानी अग्रवाल इतर नंबरवरून काही जणांच्या संपर्कात होती. मोबाईल लोकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी अखेर शिवानी अग्रवालला अटक केलं. सुरेंद्र अग्रवालनंतर अटक होईल, या भीतीखाली शिवानी अग्रवाल गायब होती.

शिवानी अग्रवालला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मास्टरप्लान आखला. गेल्या ५ ते ६ दिवसांपासून शिवानी पुणे पोलिसांना गुंगारा देत होती. शिवानी अग्रवाल सुरुवातीला लुधियाना त्यानंतर मुंबईमध्ये फिरत होती. पोलिसांना शोध लागू नये, यासाठी मोबाईल बंद ठेवून तिचा चकवा द्यायचा प्रयत्न सुरु होता. शिवानी अग्रवाल इतर नंबरवरून काही जणांच्या संपर्कात होती. मोबाईल लोकेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी अखेर शिवानी अग्रवालला अटक केलं. सुरेंद्र अग्रवालनंतर अटक होईल, या भीतीखाली शिवानी अग्रवाल गायब होती.

पोलिसांना गुंगारा देऊन लुधियाना ते मुंबई प्रवास; क्राइम ब्रँचने मास्टरप्लान आखला, शिवानी अग्रवाल अडकली जाळ्यात
Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड

दरम्यान, विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांनाही आज शनिवारी मेडिकलसाठी ससून रुग्णालयात घेऊन जाणार आहेत. तसेच विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांची रक्ताचे नमुने फेरफार प्रकरणी चौकशी होणार आहे. त्यानंतर उद्या दोघांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com