Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड

Pune Car Accident Latest News : बदलण्यात आलेलं रक्त नेमकं कुणी दिलं होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड
Sassoon Hospital PuneSaam TV

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तसेच अग्रवाल कुटुंबियांनी कसे प्रयत्न केले याची माहिती उघड होत आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे नमुने बदलले होते. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याऐवजी अन्य दुसर्‍या कुणाचे रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर पोलिसांनी ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या दोन डॉक्टरांना अटक केली.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

बदलण्यात आलेलं रक्त नेमकं कुणी दिलं होतं? याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी बदललेलं ते रक्त अल्पवयीन मुलाच्या आईचंच होतं, असं लॅब रिपोर्टमधून स्पष्ट झालं आहे. मुलाला वाचवण्यासाठी आईने डॉक्टरांना रक्ताचे नमुने दिले होते, अशी माहिती समोर आली आहे.

कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातात दोन जणांचा जीव गेला. अपघात झाल्यावर बड्या बिल्डरच्या आरोपी मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले होते. आरोपीने मद्यपान केले आहे की नाही यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र, हे नमुने घेतांना डॉक्टरांनी आरोपीचे नमुने कचऱ्यात फेकून देत दुसऱ्या कुणाचे तरी नमुने तपासणी साठी दिले.

हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी डॉक्टरांना अटक केली. त्यानंतर हे रक्त नेमकं कुणाचं याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. आता बदलण्यात आलेलं रक्त अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिचे होते, असं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी शिवानी अग्रवालला तातडीने अटक केली आहे. आज शिवानी अग्रवालची कसून चौकशी केली जाणार आहे. चौकशीत आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे अल्पवयीन आरोपीची आज पुणे पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. बाल हक्क न्याय मंडळाकडूनपुणे पोलिसांना अल्पवयीन मुलाचीची चौकशी करण्याची परवानगी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस तब्बल दोन तास अल्पवयीन मुलाचीची चौकशी करतील. त्यामुळे चौकशीत तो नेमकं काय सांगतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड
pune porsche case : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com