pune porsche case : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात

pune porsche case update : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ब्लड सॅम्पल बदलल्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नात होतो, असे डॉ. हळनोरने सांगितले.
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात
pune porsche case Saam tv
Published On

पुणे : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात मोठी ट्विस्ट समोर आला आहे. पुणे पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे डॉ. श्रीहरी हाळनोरने मान्य केले. या कृत्यासाठी डॉ. अजय तावरेचा दबाव होता. रक्ताचे नमुने बदलल्यानंतर आत्महत्येच्या प्रयत्नात होतो, असं डॉ. श्रीहरी हाळनोरने सांगितले.

पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचा ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी डॉ. तावरेचा दबाव होता, त्यामुळे रक्ताचे नमुने बदलले, असे डॉ श्रीहरी हाळनोरने कबुल केल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात
Pune Porsche Accident Case : अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले, ससून रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

या घटनेनंतर डॉ हळनोर आत्महत्येच्या प्रयत्नात होता. डॉ हळनोरने रक्ताचे नमुने बदलल्यानंतर ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माफीनामा दिला होता. या प्रकरणात माझी चूक झाली, माझ्यावर दबाव होता, अशी कबुली डॉ हळनोरने दिली.

पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट; ससूनचा डॉ. हळनोर होता आत्महत्याच्या प्रयत्नात
Pune Porsche Car Accident Update: विशाल अग्रवालला आणखी एक दणका; महाबळेश्वरातील MPG क्लबला लागला ताळा

विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार

विशाल अग्रवालच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे पोलीस विशाल अग्रवालची कोर्टात ५ दिवसांची कोठडी मागणार आहे. पोलीस ब्लड रिपोर्ट बदलायच्या आरोपाखाली विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागणार आहे.

पोलीस न्यायालयात विशाल अग्रवालचे प्रोडक्शन वॉरंट सादर करणार आहे. विशाल अग्रवालची कोठडी संपत आहे. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयातून नेण्यात आले.

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल या दोघांना न्यायालयीन कोठडी

विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघे आता या गुन्ह्यात जामीनीसाठी अर्ज करु शकणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com