ओंकार कदम, साम प्रतिनिधी
सातारा : कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला प्रशासनाने आणखी एक दणका दिलाय. अग्रवाल यांचे महाबळेश्वर येथील अनधिकृत हॉटेल कनेक्शन समोर आलं. या हॉटेलमध्ये अनाधिकृतरित्या बार सुरू असल्याची माहिती तक्रारदार अभय हवालदार यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज हा बार बंद केल्याची कारवाई केली. मात्र हा अनाधिकृत क्लब अजूनही सुरू आहे. याबाबत पुढील कारवाई कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
हिट अँड रन प्रकरणातील मुलाला वाचवण्यासाठी आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांनी गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी न्यायालयाने या दोघांना 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपी विशाल अग्रवाल यांचं सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कनेक्शन असल्याची माहिती समोर आली. विशाल अग्रवालने महाबळेश्वर येथील शासकीय भाड्याच्या जागेतच अनाधिकृत पंचतारांकीत हॉटेल उभारलं होतं.
महाबळेश्वर मधील एक शासकीय जागा भाडेतत्वावर घेऊन त्या ठिकाणी विशाल अग्रवाल यांनी पंचतारांकित हॉटेल सुरू ठेवले आहे. एमपीजी क्लब हे विशाल अग्रवाल यांचे हॉटेल असून सरकारी जागेवर उभारण्यात आले . महाबळेश्वरमधील सिटी सर्व्हे नंबर 233 या सरकारी मिळकत असून ही मिळकत पारशी जिमखाना या ट्रस्टला 30 वर्षांच्या कराराने देण्यात आली.
या मिळकतीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण करण्यात आलं. 2016 मध्ये पारशी जिमखाना या ट्रस्टवर पारशी नसलेले सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि उषा सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना घेण्यात आले आहे. त्यानंतर केवळ चार वर्षांनी म्हणजे 2020 मध्ये पारशी जिमखाना ट्रस्टवर असलेल्या या सर्व ट्रस्टींची नावे कमी झालीत. त्या ठिकाणी विशाल अग्रवालच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे ट्रस्टी म्हणून दाखल करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.