Pune Hit and Run case : पुणे हिट अँड रन प्रकरण : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, मुलाच्या वडिलानंतर आणखी तिघांना अटक

Pune Hit and Run case News : पोलिसांनी अल्पवयीन असूनही पबमध्ये मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकाचा सामावेश आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरण : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, मुलाच्या वडिलानंतर आणखी तिघांना अटक
Pune Hit and Run caseSaam tv

नितीन पाटणकर, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई सुरु केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन असूनही पबमध्ये मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या आणखी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकाचा सामावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक केल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पुणे पोलिसांनी वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केल्यानंतर कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या व्यवस्थापक आणि मालकांना अटक करण्यात आली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरण : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, मुलाच्या वडिलानंतर आणखी तिघांना अटक
Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!

पोलिसांनी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना अटक केली आहे. या आरोपी विरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिन्ही पब चालकांना पोलिसांनी आता अटकेची कारवाई केली आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरण : पुणे पोलीस अॅक्शन मोडवर, मुलाच्या वडिलानंतर आणखी तिघांना अटक
Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना

पब आणि बार रात्री बाराच्या नंतर बंद करण्याची मागणी

पुणे शहरातील पब आणि बार रात्री बारा वाजेच्या आत बंद करा, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात अपघात हा रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार संस्कृतीमुळे घडला आहे. शहरातील पब आणि बार संस्कृतीला आळा घालण्यात अत्यंत आवश्यक आहे. या निर्णयामुळे घडणाऱ्या घटना टाळता येतील, अशी मागणी भानगिरी यांनी केली.

तसेच पत्रातून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबतही विनंती करण्यात आली आहे. पत्रावर संपर्कप्रमुख अजय बापू भोसले, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सह्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com