Pune Porsche Car Accident Case: हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात माझा संबंध नाही; आरोपानंतर आमदार सुनिल टिंगरेंचं स्पष्टीकरण

MLA Sunil Tingre Facebook Post: हिट अॅण्ड रन प्रकरणात आमदार टिंगरे याचे नाव आल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. आमदाराच्या मदतीनेच आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याचा आरोप केला गेला होत. त्यानंतर आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Pune Porsche Car Accident Case:  हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात माझा संबंध नाही;  आरोपानंतर आमदार सुनिल टिंगरेंचं स्पष्टीकरण
MLA Sunil Tingre Facebook Post
Published On

पुणे : पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात नव-नवीन अपडेट समोर येत आहेत. या अपघातील आरोपीवर स्थानिक आमदाराचा वरहस्त असल्याचा आरोप केला गेला. यावर वडगावशेरीचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण देत आपली बदनामी केली जात असल्याचं म्हटलंय. अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण आमदार सुनिल टिंगरे यांनी दिलंय

सुरुवातीला होणाऱ्या आरोपांकडे आपण दुर्लक्ष केलं परंतु याचा फायदा विरोधक घेत असल्याचं समजल्यानंतर आपली भूमिका मांडणं गरजेचं असल्याचं सुनिल टिंगरे हे स्पष्टीकरण देताना म्हणालेत. अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मिडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत असल्याचं स्पष्टीकरण आमदार सुनिल टिंगरे यांनी दिलंय.

टिंगरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टद्वारे आपल्यावरील आरोप खोडून काढलेत. सोशल मीडियावर आपली प्रतिमा डागळण्याचं काम केलं जात असल्याचं टिंगरे आपल्या स्पष्टीकरणात म्हणालेत. पुण्यातील हिट अॅण्ड रन प्रकरणात दोषीवर कारवाई व्हावी, यासाठी आपण पोलीस स्टेशन गेलो असल्याचं टिंगरे म्हणालेत. आपण आधीपासूनच ‘नाईट लाईफ’च्या विरोधात आहोत. त्यासाठी आपण वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणीनगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेले पब, बार, आणि टेरेस हॉटेल तसेच दारू विक्री मटका धंदा, हुक्क पार्लर या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात यावी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र दिल्याचं टिंगरे म्हणालेत.

काय आहे फेसबूक पोस्ट

कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन्ही मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुण-तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल, असा मला विश्वासही आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी आशा असल्याचं टिंगरे म्हणालेत.

या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वयेही संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. याबाबत सुरूवातीला दुर्लक्ष केलं, परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे.माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे ३ च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करुन दिली.

तसंच माझे परिचित विशाल आगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरक्षक हे अपघातातील तरुण-तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं. मी त्यांना फोन केला असता १५ मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर पीआय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो.

Pune Porsche Car Accident Case:  हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात माझा संबंध नाही;  आरोपानंतर आमदार सुनिल टिंगरेंचं स्पष्टीकरण
Pune Porsche Car Accident Case: आरोपीला वाचवण्यासाठी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव; RTI अधिकाऱ्याचा आरोप

मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील, यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी ६ वाजता याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली.दरम्यान या अपघातप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती याठिकाणी नमूद केल्याचं आमदार टिंगरे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com