Lonavala Accident : खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दाेघांचा मृत्यू, सहा जण जखमी

लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. तेथेच अपघात झाला.
two passed away six injured in accident at lonavala khandala
two passed away six injured in accident at lonavala khandala Saam Digital

जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दाेघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातामधील सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनूसार पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.(Maharashtra News)

लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला.

two passed away six injured in accident at lonavala khandala
Sinhagad Fort Pune: सिंहगड किल्ल्याचा घाट रस्ता आजपासून राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

ही कार अलिबाग वरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी आणि भूमिका चौधरी हे सहा जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

two passed away six injured in accident at lonavala khandala
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com