Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना

Devendra Fadnavis On Pune Porsche Car Accident: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दोषींवर कडक करवाई करा, अशा सुचना त्यांनी पुणे पोलीस आयुक्ताना दिल्यात.
Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना
Devendra Fadnavis On Pune Porsche Car AccidentSaam Tv

मुंबई: पुण्यात प्रसिद्ध व्यावसायिकाच्या मुलानं दोन आयटी अभियंत्यांना आपल्या कारखाली चिरडल्याची घटना घडली होती. पण ज्यानं अपघात घडवला त्या अल्पवयीन कार चालकाला अवघ्या काही तासात जामीन मिळाला होता. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होतोय. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत.

दरम्यान अपघाताची घटना घडल्यानंतर तेथील स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे कारमधून बाहेर काढून चोप दिला होता. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. मात्र त्यानंतर धनिकपुत्र अवघ्या १५ तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. याप्रकरणी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणाची दखल उपमुख्यमंत्र्यांनी घेतलीय. या प्रकरणातील कारचालकावर कठोर कारवाई करावी, अशा सुचना देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिल्यात.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन करुन या सुचना दिल्यात. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.

त्यावरूनही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीय. आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असेल तर त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासावेत. ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात.

Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना
Pune Hit And Run : पुण्यातील पोर्शे कारचा भयानक अपघात; ड्रंक अँड ड्राइव्हचा दुसरा CCTV व्हिडिओ आला समोर

मुलाचे वडील आणि दारु देणाऱ्या २ पब चालकांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण- तरुणीचा मृत्यू झाला. कार चालवणारा तरुण हा शहरातील एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा असून त्याला अवघ्या काही तासात जामीन मंजूर झाला. दरम्यान या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल आणि त्याला दारू देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुलगा अल्पवयीन असून देखील त्याला दारु देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com