Pune Hit And Run : पुण्यातील पोर्शे कारचा भयानक अपघात; ड्रंक अँड ड्राइव्हचा दुसरा CCTV व्हिडिओ आला समोर

Pune Hit And Run news update : या भीषण अपघाताचा काल एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आज या भयंकर अपघाताचा दुसरा सीसीटीव्ही समोर आला आहे.
पुण्यातील पोर्शे कारचा भयनाक अपघात; ड्रंक अँड ड्राइव्हचा दुसरा CCTV व्हिडिओ आला समोर
Pune Hit And RunSaam tv

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : पुण्यात रविवारी रात्री अडीच वाजता कल्याणीनगर परिसरात एका भरधाव पोर्शे कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघांचा जीव गेला होता. या प्रकरणात दुचाकीला धडक देणाऱ्या अल्पवयीन मुलाला १२ तासांत जामीन मिळाला होता. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल झालाय. तसेच या भीषण अपघाताचा काल एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आज या भयंकर अपघाताचा दुसरा सीसीटीव्ही समोर आला आहे.

पुण्यात रविवारी हिट अँड रन प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातातील आरोपी कारचालक आणि त्याच्या पालकाविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोघांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे. काही तासांपूर्वी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाचा पबमध्ये मद्य पितानाचा व्हिडिओही समोर आलाय. त्यामुळे पबमध्ये मद्य प्यायल्यानंतर या अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्याची घटना घडली. त्यानंतर या घटनेचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलं आहे.

पुण्यातील पोर्शे कारचा भयनाक अपघात; ड्रंक अँड ड्राइव्हचा दुसरा CCTV व्हिडिओ आला समोर
Tamil Nadu Shocking News: दुसऱ्या मजल्याच्या छतावर बाळ अडकलेच कसे? आई सोशल मीडियावर झाली ट्रोल, सहन न झाल्यानं स्वतःलाच संपवलं

पुण्यातील भयानक पोर्शे कारच्या अपघाताचा दुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडिओमध्ये कार भरधाव वेगाने जाताना दिसत आहे. अपघाताच्या जवळचे ठिकाण व्हिडिओमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर लोक पळून जाताना दिसत आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच मृत्यू पावले आहेत.

पुण्यातील पोर्शे कारचा भयनाक अपघात; ड्रंक अँड ड्राइव्हचा दुसरा CCTV व्हिडिओ आला समोर
Pune Car Accident: हिट अँड रन केस: प्रसिद्ध व्यावसायिक आहेत म्हणून सोडू नका, रविंद्र धंगेकर आक्रमक; पोलिसांना आंदोलनाचा इशारा

मुलाचे वडील आणि पब चालकांवर गुन्हा दाखल

पुण्याती कल्याणी नगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच दारू देणाऱ्या पब चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोर्शे कारने अपघात करून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला मुलगा हा अल्पवयीन आहे.

या अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर दारू देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे, बार काऊंटर जयेश बोनकर यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com