Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!

Pune Porsche Car Accident News Update: घटनेनंतर आता पुणे पालिका प्रशासनही अॅक्शन मोडवर आली असून शहरातील पब्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या तपासणी करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.
Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!
pune muncipal corportation (pmc)saam tv

सचिन जाधव, पुणे|ता. २१ मे २०२४

पुणे शहरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर शहरातील पब आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे आरोप करत राजकीय नेत्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे. या घटनेनंतर आता पुणे पालिका प्रशासनही अॅक्शन मोडवर आली असून शहरातील पब्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील बेकायदा बांधकामांच्या तपासणी करण्याचे महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पोलिसांपाठोपाठ पबविरोधात आता महापालिकेनेही ॲक्शन मोडवर आली आहे. शहरातील पब्ज, हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कारवाईचा बडगा उगारला असून बेकायदा बांधकामांच्या तपासणी करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

या पुढे पब तसेच हाॅटेलला अनधिकृत बांधकाम प्रकरणात बजावण्यात आलेल्या नोटीसांवर काय कारवाई करण्यात आली, याचा अहवाल दर महिन्याला स्थायी समितीसमोर ठेवावा लागणार आहे. बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभागास आदेश दिले आहेत. महापालिकेने जानेवारी २०२३ मध्ये शहरातील अनधिकृत बांधकामे असलेल्या पब आणि बांधकामांना नोटीस दिल्या होत्या.पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!
Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार

मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने महापालिकेनेच दोन वेळा कारवाई केली आहे. त्यानंतर आता पालिका पुन्हा पब विरोधात आक्रमक झाली आहे. दरम्यान, शहरातील कल्याणीनगर परिसरातील पोर्शे कार अपघात प्रकरणी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली असून कारचालक मुलाचे वडिल विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आहे.

Pune Car Accident: पुणे हिट अँड रन केस: शहरातील पब, हॉटेल, बारविरोधात पालिका प्रशासन आक्रमक; बेकायदा बांधकामांच्या तपासणीचे आदेश!
Lonavala Accident : खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील दाेघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com