Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान; पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार

Sambit Patra Apologize: भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असे धक्कादायक विधान संबित पात्रा यांनी केले. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून त्यानंतर संबित पात्रा यांनी माफी मागितली आहे.
Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेते संबित पात्रांचे वादग्रस्त विधान, पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार
Sambit Patra Apologize:Saamtv

दिल्ली, ता. २१ मे २०२४

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ओडीसामधील पुरी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद सुरू झाला आहे. भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान मोदींचे भक्त आहेत, असे धक्कादायक विधान संबित पात्रा यांनी केले. त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून त्यानंतर संबित पात्रा यांनी माफी मागितली आहे.

देशभरात सध्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू आहे. लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांची जुगलबंदी पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी भगवान जगन्नाथ हे मोदींचे भक्त होते, असे विधान केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे वादग्रस्त विधान केले. पात्रा यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री नवीन पटनाईक, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली. त्यानंतर संबित पात्रा यांनी माफी मागितली असून तीन दिवस उपवास धरुन प्रायश्चित करणार असल्याचे सांगितले आहे.

Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेते संबित पात्रांचे वादग्रस्त विधान, पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार
Pune Porsche Car Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवाल अखेर सापडला; पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून पकडलं

दरम्यान, रात्री १ वाजता ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत संबित पात्रा यांनी माफी मागितली. "मी जगन्नाथजींच्या चरणी मस्तक टेकवून माफी मागतो. पश्चात्ताप करून माझी चूक सुधारण्यासाठी मी पुढील ३ दिवस उपवास करेन" असे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Sambit Patra: 'भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त', भाजप नेते संबित पात्रांचे वादग्रस्त विधान, पश्चातापासाठी ३ दिवस उपवास करणार
Pune Hit and Run Case: देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारचालकावर कठोर कारवाईच्या सूचना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com