अनेक दिवसांपासून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. प्रत्येकजण कुटुंबियाना घेऊन बाहेर गावी तर काहीजण परदेशात फिरायला जात आहेत. त्यातच अनेक पर्यटंकाची पंसतीही सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला दिसून येत आहे. महाबळेश्वरला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर (kashmir)म्हणून ओळखले जाते. परंतू आता आलेल्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये तासंनतास पर्यटकांना अडकून पडावे लागत असल्याने पर्यटक हैराण झाले आहेत.
महाबळेश्वरमध्ये काही वर्षांपासून पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. लहानापासून ते मोठ्यांना असे महाबळेश्वर ठिकाण अत्यंत आवडीचे पर्यटन स्थळ बनले आहे. महाबळेश्वरमध्ये पर्यटक वर्षभर हजेरी देत असतात. मात्र सध्या अवकाळी पावसामुळे आणि लागूनच उन्हाळ्याच्या सुट्ट्ट्या असल्याने पर्यटकांची पाऊले आपसुकच महाबळेश्वरकडे वळली जात आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये प्रचंड गर्दी (crowd)झाली आहे. दरम्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी वाढत आहे. दरवर्षी या महामार्गावर पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
महाबळेश्वरला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायल मिळत आहे. पर्यटक तासनतास वाहतूक कोंडीत अडकले आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये तासनतास अडकल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत.
चारधाम यात्रा सुरु झाली आहे. त्यामुळे केदारनाथ, हरिद्वार, बारकोट, यमुनोत्री, उत्तरकाशी या परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी महामार्ग अरुंद असल्याने वाहतूक कोंडी वाढत आहे. भाविकांना जवळपास १०-१३ तास एकाच जागी अडकून राहावे लागत आबे. महाराष्ट्रातूनदेखील चारधाम यात्रेला भाविक गेले आहेत.वारजे, किरकटवाडी येथील पाच जन व कोथरूड, खराडी परिसरातील २० जणांचा ग्रुप या वाहतूक कोंडीत यमुनोत्री, गंगोत्री मार्गावर अडकला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.