Priyanka Gandhi: प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल

Nandurbar News: नंदुरबारमधून एक अचंबित करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहावं तिथे फक्त गर्दीच गर्दी अन् माणसेच माणसे दिसत आहेत आणि या गर्दीत दिसत आहेत त्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी.
प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल
Priyanka GandhiSaam Tv
Published On

Priyanka Gandhi in Nandurbar:

नंदुरबारमधून एक अचंबित करणारा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहावं तिथे फक्त गर्दीच गर्दी अन् माणसेच माणसे दिसत आहेत आणि या गर्दीत दिसत आहेत त्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी. नंदुरबारमध्ये आज प्रियांका गांधी यांना पाहण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये हजारो माणसांच्या गर्दीत प्रियांका गांधी या लोकांचं अभिवादन स्वीकारताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथे काँग्रेस उमेदवार एड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सभा संपल्यानंतर अचानक लोकांमध्ये जात त्यांच अभिवादन स्वीकारलं. प्रियांका गांधी सभा स्थळापासून हेलिपॅडकडे परत जात असताना अचानक गाडीतून खाली उतरल्या आणि सुरक्षा रक्षकांचे एकच धावपळ उडाली.

प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल
Arvind Kejriwal : तुरुंगात गेल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवालांनी सांगितली कारणे

प्रियांका गांधी गाडीतून उतरून जनतेमध्ये जात लोकांच अभिवादन स्वीकारलं. उत्साही लोकांनी त्यांच्या भोवती एकच गर्दी केली होती. सुरक्षा रक्षकानी त्यांना सुरक्षितरित्या गाडीमध्ये बसवत पुढे नेलं. यावेळेस त्यांनी गाडी बाहेर येत लोकांना अभिवादन केलं. यानंतर त्यांचा ताफा हेलिपॅडकडे रवाना झाला.

दरम्यान, नंदुरबारमधील हा व्हिडीओ स्वतः प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटरवर अकाऊंवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''या उत्साही स्वागतासाठी नंदुरबार, महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार.''

प्रियांका गांधींना पाहण्यासाठी नंदुरबारमध्ये उसळला जनसागर, VIDEO तील गर्दी पाहून अचंबित व्हाल
Suresh Jain: दोन दिवसांवर निवडणूक, जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

प्रियांका गांधी यांनी ट्वीट केलेला हा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रिट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं आहे. हा व्हिडीओ रिट्वीट करत ते म्हणाले आहेत की, ''महाराष्ट्र असो वा उत्तर प्रदेश, हरियाणा असो की बिहार, सर्वत्र इंडिया आघाडीचे वादळ वाहू लागले आहे. मी पुन्हा सांगतो, नरेंद्र मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com