Suresh Jain: दोन दिवसांवर निवडणूक, जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

Jalgaon Lok Sabha: राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाला फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना जळगावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
Suresh Jain
Suresh JainSaam Tv

Maharashtra Politics:

>> संजय महाजन

राज्यात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाला फक्त दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना जळगावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासावर विश्वास ठेवून भाजपला पाठिंबा जाहीर करत, असल्याचे सुरेश जैन यांनी स्पष्ट केलं आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांना आपले बहुमूल्य मत देऊन मोदीजींचे हात बळकट करण्याचे सुरेश जैन यांनी आवाहन केलं आहे.

Suresh Jain
Bijapur News: छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सापडले १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह

ऐन मतदानाची दोन दिवसआधी जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने येथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो.

भाजपला पाठिंबा जाहीर करण्याआधी सुरेश जैन यांच्या भेटीला मंत्री गिरीश महाजन हे जळगावमध्ये आले होते. यावेळी गिरीश महाजन यांच्या समवेत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या देखील उपस्थिती होत्या. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री सुरेश जैन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

Suresh Jain
Gadchiroli, Chhattisgarh Naxalite: छत्तीसगड सीमेवर जहाल नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

शुक्रवारी जळगावमध्ये दाखल झाल्यानंतर आपण कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सुरेश जैन यांनी सांगितलं होतं. गिरीश महाजन यांनी भेट आणि मोदींना पाठिंबा जाहीर जाहीर केल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असायची चर्चा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com