Gadchiroli, Chhattisgarh Naxalite: छत्तीसगड सीमेवर जहाल नक्षलवाद्याला अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

Maharashtra Government: नक्षलवादी चैनुरामवर महाराष्ट्र शासनाने 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
Gadchiroli, Chhattisgarh Naxalite
Gadchiroli, Chhattisgarh NaxaliteSaam Digital
Published On

Gadchiroli, Chhattisgarh Naxalite

खून, जाळपोळ, चकमक अशा विविध गुन्ह्यात सहभागी असलेला जहाल नक्षलवादी चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा (छत्तीसगड) याला गडचिरोली पोलिसांच्या विशेष अभियान पथकाने अटक केली आहे. छत्तीसगड सीमेवरील जारावंडी ते सोहगावला जाणाऱ्या कुरमावडा फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. चैनुरामवर महाराष्ट्र शासनाने 16 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

शनिवारी नक्षलवादी चैनुराम गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जारावंडी आणि पेंढरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घातपात घडवण्याच्या उद्देशाने रेखी करताना आढळून आला. त्याला विशेष अभियान पथकाने अटक केली. 26 जून 2002 मध्ये चैनुराम पार्लकोटा दलात भरती झाला होता. 2003 पर्यंत तो एसीएम पदावर कार्यरत होता. त्यांनतर पदोन्नती मिळाली होती. 2014 पर्यंत तो मर्ड डिव्हिजन मध्ये कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे सात आणि खुनाचा एक गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली.

Gadchiroli, Chhattisgarh Naxalite
Ambabai Mandir: अंबाबाई मंदिरात चित्रणास जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी; नव्या आदेशाने कोल्हापुरात नाराजीचा सूर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com