Arvind Kejriwal News:
तुरुंगात गेल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही? असा प्रश्न त्यांच्या अटकेनंतर अनेकवेळा त्यांच्या विरोधकांनी विचारला होता. याचे उत्तर आता स्वतः केजरीवाल यांनी दिले आहे. दिल्लीतील कथित मद्य धारण घोटाळ्याप्रकरणी नुकतेच तुरंगातून बाहेर आलेले अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना हाच प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, मी हुकूमशाहीविरुद्ध लढतोय, त्यामुळेच मी राजीनामा दिला नाही, असे केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना अटक करून तुरुंगात टाकून केंद्र सरकारला दिल्लीतील सरकार पाडायचे होते. म्हणूनच मी तुरुंगातून सरकार चालवणार, राजीनामा देणार नाही, असे सांगितले. त्या हुकूमशहाविरुद्ध मी मनाने, तनाने आणि धनाने लढत असल्याचे केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल म्हणाले की, ''मी तुरुंगात असताना केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का देत नाहीत, असा मुद्दा काही लोकांनी उपस्थित केला. मला कधीही कोणत्याही पदाचा लोभ नाही. मी इथे मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा हे सर्व व्हायला आलो नाही. मी आयकर आयुक्त म्हणून काम करायचो.''
ते म्हणाले, ''इन्कम टॅक्स कमिशनरची नोकरी सोडून, एक नाही, दोन नाही, तीन नाही, मी 10 वर्षे दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये - सुंदर नगरी आणि नंद नगरी झोपडपट्टीत काम केले आहे. जेव्हा दिल्लीच्या जनतेने मला पहिल्यांदा मुख्यमंत्री केले, तेव्हा मी दिल्लीतील शाळांच्या मुद्द्यावर 49 दिवसांत राजीनामा दिला. लोक शिपायाची नोकरी सोडत नाहीत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला लाथ मारली.''
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देण्यामागची कारणे सांगताना केजरीवाल म्हणाले, ''माझ्यासाठी मुख्यमंत्रीपद महत्त्वाचे नाही. मी तुरुंगात गेल्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही, असं विचारात असाल तर, गेल्या 75 वर्षात अनेक निवडणुका झाल्या. दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार प्रचंड बहुमताने विजयी झाले. 75 वर्षात कोणत्याही सरकारला इतके प्रचंड बहुमत मिळालेले नाही. पुढील 20 वर्षे दिल्लीत आपला कोणीही हरवू शकत नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांना तुरुंगात पाठवण्याचा खोटा राजकीय डाव रचला. मला खोट्या प्रकरणात अडकवून. त्यांनी हा कट रचला, मीही राजीनामा देणार नाही, असे सांगितले. लोकशाहीला तुरुंगात कैद केले तर लोकशाही तुरुंगातून मुक्त होईल. तुरुंगातून सरकार चालवणार. आपल्या जाळ्यात अडकणार नाही.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.