Devendra Fadnavis News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis on opposition allegations : 'आम्ही कोणाचं घर फोडत नाही, कोणाचा पक्ष फोडत नाही. पण संधी आली तर सोडत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
Devendra Fadnavis News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Devendra Fadnavis about Gandhi and Godsesaam tv

पुणे : लोकसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण चांगलं तापलं आहे. या लोकसभा निवडणुकीमळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचारसभांमधून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले जात आहेत. विरोधकांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातून उत्तर दिलं. 'आम्ही कोणाचं घर फोडत नाही, कोणाचा पक्ष फोडत नाही. पण संधी आली तर सोडत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील लोकसभेचे उमेदवार शरद मोहोळ यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून आहेत. याचदरम्यान, फडणवीसांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत विरोधकांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. 'आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही. पण संधी मिळाली तर सोडत नाही. सोबत जर येत असेल, तर त्यांना का टाळायचं? असा सवाल त्यांनी केला.

Devendra Fadnavis News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Dhule Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 432 मतदारांनी बजावला हक्क

'शिवसेनेची ही परिस्थिती का आली, घराणेशाहीमुळे आली. राष्ट्रवादीची ही परिस्थिती का आली, ती कुटुंबाला प्राधान्य यामुळे आली. त्या ठिकाणी शेवटी अजित पवारांनी हा पक्ष शरद पवारांसोबत उभा केला. जमिनीवर अजित पवारांनी पक्ष उभा केला. आमदार देखील अजित पवारांच्या पाठिशी होते. अशा परिस्थिती अजित पवारांना डावललं गेलं. प्रत्येक वेळी त्यांना समोर आणून व्हिलन केलं जायचं. त्यामुळे अजित पवारांनी अस्तित्वाचा विचार केल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Ajit Pawar: 'पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की डोकं खाजवायला लावतात', अजित पवार पुन्हा बोलले; नेमकं काय म्हणाले?

राज्याच्या विकासाच्या प्रश्नावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्रातील सस्टेनेबल शहर म्हणून आम्ही करत आहोत. महागाई, गद्दारी या नॅरेटिव्हने निवडणुका जिंकता येत नाही. आमच्या विरोधकांच्या भाषणामध्ये 1 टक्के पण विकासाचे मुद्दे नसतात. गद्दार आणि खुद्दारवर निवडणुका जिंकता येत नाही.

'विरोधकांना माहीत आहे की, निवडणूक विकासावर किंवा मोदींवर गेली तर आपला पराभव निश्चित आहे. पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ खूप महत्वाचं आहे ते आम्ही करणारच. महाराष्ट्रात 45 चा नारा दिला आहे. आमच्या नेत्यांना विचारून सांगतो, 3 कोणत्या सोडल्या आहेत, पण बारामती आम्ही जिंकत आहोत, असा दाव त्यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com