Ajit Pawar: 'पवार साहेब असं स्टेटमेंट करतात की डोकं खाजवायला लावतात', अजित पवार पुन्हा बोलले; नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar On Sharad Pawar: अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला असून पवारसाहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांनी डोक खाजवलं पाहिजे, असा टोला लगावला आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Sharad Pawar vs Ajit Pawar NCP Saam TV

पुणे|ता. ९ मे २०२४

लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, या शरद पवार यांच्या विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यावरुनच अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला असून पवारसाहेब असं स्टेटमेंट करतात की लोकांनी डोक खाजवलं पाहिजे, असा टोला लगावला आहे.

काय म्हणाले अजित पवार?

"पवार साहेब असे स्टेटमेंट करतात की लोकांमध्ये संभ्रम झाला पाहिजे. लोकांनी डोक खाजवायला सुरूवात केली पाहिजे. हा कोणता नवा डाव टाकला? म्हटलं पाहिजे. अजून अनेक टप्प्यातील मतदान व्हायचं आहे. बारामतीचे मतदान झाले आणि दुस-याच दिवशी काँग्रेससोबत जाण्याबाबत शक्यता असल्याचे विधान केले. मात्र आधी सोनिया गांधी परकीय असल्याची भूमिका घेत काँग्रेसपासून लांब गेले. आता त्यांना काँग्रेस का चांगली वाटायला लागली, हे कळायला मार्ग नाही.." असे अजित पवार म्हणाले.

"उद्धव ठाकरेही सोबत येतील असेही त्यांनी सांगितले. मात्र अडीच वर्ष मी उद्धवजींसोबत उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार नाहीत. त्यांची भूमिका वेगळी आहे. कोणी समजून सांगितले तरी ते ऐकणार नाहीत. मी त्यांच्यासोबत काम केले असल्याने त्यांचा स्वभाव जवळून पाहण्याची संधी मिळाली. आमच्यात वाद वगैरे नव्हता," असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Pune Crime News: पुण्यात कोयता गँगचा पुन्हा हैदोस... किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला; ३ अटकेत

तसेच "शरद पवार म्हणाले माझ्या सहकार्यांना विचारणार. मात्र ते सहकाऱ्यांना विचारत नाहीत. मात्र ते असं काही सांगतात की सहकारी हो म्हणतात. मात्र काँग्रेससोबत जाण्याची त्यांची काय रणनिती आहे, हे कळायला मार्ग नाही," असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

Sharad Pawar vs Ajit Pawar NCP
Supriya Sule News: 'कोणाला काय मिळालं हिशोब करा, सगळं स्पष्ट होईल', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर पलटवार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com