Supriya Sule News: 'कोणाला काय मिळालं हिशोब करा, सगळं स्पष्ट होईल', सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर पलटवार

Supriya Sule: संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं आहे. अशी संपवायची भाषा खूप धक्कादायक आणि दुर्दैवी होतं. लोकशाहीत असं चालत नाही," असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
Supriya Sule News
Supriya Sule NewsSaam TV

पुणे|ता. ९ मे २०२४

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा फटका बसला, अशी चर्चा आता महायुतीमधील नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या चर्चांवर आता महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून लोकशाहीत संपवण्याची भाषा दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य दीड महिन्यांपूर्वी केलं होतं. आम्हाला वेदना देणारे हे वक्तव्य आहे. शरद पवारांना संपवायचं आहे, हे शब्द चंद्रकांत दादांचे होते. ते असं का बोलले होते? हे आम्हाला समजलं नव्हतं. मात्र गेली महिनाभर यावर कोणी बोललं नाही. ही प्रवृत्ती वाईट आहे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं आहे. अशी संपवायची भाषा खूप धक्कादायक आणि दुर्दैवी होतं. लोकशाहीत असं चालत नाही," असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

अजित पवारांचा दावा खोडला..

"शरद पवार यांचा मुलगा असतो तर मलाही सत्ता मिळाली असती असे विधान अजित पवार यांनी केले आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे."मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणाला काय मिळालं याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि दादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळे स्पष्ट होईल. खूप सोप्प उत्तर आहे," असे प्रत्यूत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.

Supriya Sule News
Sharad Pawar News: सरसकट पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार नाहीत; शरद पवारांचे मोठे विधान

काय म्हणाले होते अजित पवार?

"आम्ही आता ६० च्या पुढे गेलो. आम्हाला कधीतरी संधी आहे की नाही? मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मलाही संधी मिळाली असती ना. हा कोणता न्याय? असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडून डावलले गेल्याचा खंत व्यक्त केली होती. तसेच भाजपसोबत जाण्यासाठी ६ बैठका पवारांनी घेतल्या होत्या, असा दावाही अजित पवार यांनी केला होता.

Supriya Sule News
Bhandara News : वाळू माफियाकडून मागितली २० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com