Mumbai Police Threat Call: ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन

Taj Hotel Mumbai Airport Threat Call: एका अज्ञात व्यक्तीने ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याची धमकी मुंबई पोलिसांना फोन करून दिली आहे.
ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन
Mumbai Police Threat CallSaam Tv

सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई प्रतिनिधी

एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हाॅटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. आज दुपारी पोलिसांना हा फोन आला, अशी माहिती मिळत आहे.

धमकीचा फोन येतात मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. पोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्ना यांनी आई-वडिलांची मागितली माफी; 31 मे रोजी SIT समोर हजर राहणार, स्वतःच दिली माहिती

तसेच ज्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

नागपुरात 4 जूनला बॉम्ब ठेवणार

याआधी 4 जूनला नागपुरातील सीताबर्डी बाजारातील दुकानात बॉम्ब ठेवणार, असा धमकीचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. घटनास्थळी पोलीस पथकही दाखल झालं होतं. येथील मोदी नंबर 2 आणि मोदी नंबर 3 बाजार ओळीमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याचं धमकीत म्हटलं आहे. यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आहे.

ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवलाय; पोलीस कंट्रोल रुमला धमकीचा फोन
Mumbai Police Action On Pub: पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर! शहरातील पब, बारची झाडाझडती सुरू

दरम्यान, देशात आणि राज्यात 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. यामुळे संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे. तसेच सगळ्याच महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून अनेक ठिकाणी पोलिसांच्या गस्तही वाढवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com