Nagpur News : सीताबर्डी बाजारपेठेत ४ जूनला बॉम्ब ठेवण्याची धमकी, नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणांची उडाली तारांबळ

Nagpur Bomb Threat News : नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी बाजारातील दुकानात 4 तारखेला बॉम्ब ठेवणार असा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून घटनास्थळी तपास सुरू आहे.
Nagpur News
Nagpur NewsSaam Digital

नागपुरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी बाजारातील दुकानात 4 तारखेला बॉम्ब ठेवणार असा फोन 112 वर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोध पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली मात्र, बाजारपेठेत काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही. खबरदारी म्हणून बाजारपेठेत गस्त वाढवण्यात आली आहे.

सीताबर्डी बाजारातील मोदी नंबर 2 आणि मोदी न 3 बाजार ओळीमध्ये बॉम्ब ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. यात पोलिसांनी फोन आलेल्या नंबरची माहिती मिळाली असून या बाबत त्या नंबर वरून नेमका कोणी फोन केला याचा तपास सुरू असल्याची माहिती बर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले यांनी दिली आहे.

नागपूरमधील सीताबर्डी बाजार नेहमीच गजबजलेला असतो. नागपूरकर सीताबर्डी मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत असतात. सणासुदीच्या काळात तर बाजारपेठ फुलून गेलेली असते, त्यात ४ जून रोजी लोकसभेचा निकाल आहे. आणि याच दिवशी या गजबजलेल्या बाजारपेठे बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुले तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

Nagpur News
Chhattisgarh Naxalites Encounter: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर चकमक, ८०० जवानांकडून ऑपरेशन; ८ नक्षलवाद्यांचा खात्म करण्यात यश

पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक तात्काळ घटनास्थळी दाखलं झालं आणि भागात तपासणी केली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान याआधीही अशा अफवा पसरवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोणतही खोडसाळपणा केल्याचा संशय असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

Nagpur News
UP Crime: पुजाऱ्यानं डोकं फिरवलं, गर्भवती पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com