UP Crime: पुजाऱ्यानं डोकं फिरवलं, गर्भवती पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा

Uttar Pradesh Crime: आपल्याला परत ६ वी मुलगीच होईल, या शंकेने ग्रासलेल्या एका व्यक्तीने गर्भवती पत्नीचं पोट चिरल्याची घटना घडली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
UP Crime: पुजाऱ्यानं डोकं फिरवलं, गर्भवती पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा
man slits open wifes womb to check baby s genderSaam Tv
Published On

नवी दिल्ली : वंशाचा दिवा हवा, या विचाराने ग्रासलेल्या एका व्यक्तीने गर्भाचं लिंग तपासण्यासाठी चक्क आपल्या गर्भवती पत्नीचं पोट चिरल्याची घटना उत्तर प्रदेशातील बुडाऊनमध्ये घडली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. ही घटना १९ सप्टेंबर २०२० रोजी बुडाऊनच्या सिव्हिल लाइन्स भागात घडली होती. याप्रकरणाचा न्यायलयाने आज दिला.

याप्रकरणातील दोषी पतीचं नाव पन्ना लाल ( वय ४६), तर पत्नीचं नाव पत्नी अनिता देवी, असं आहे. बाळाचं लिंग तपासण्यासाठी पन्ना लालने आपल्या ८ महिन्याच्या गर्भवती पत्नीचं पोट चिरलं. याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सौरभ सक्सेना यांनी गुरुवारी हा निर्णय दिलाय. बाळाचं लिंग तपासण्यासाठी पन्ना लालने विळ्याने पत्नीचं पोट चिरलं होतं. आपल्याला परत ६ वी मुलगी होईल, अशा शंकेने पन्ना लालने हे कृत्य केलं होतं. हे कृत्य करण्यास त्याला गावातील पुजाऱ्याने प्रवृत्त केलं होतं.

पुजाऱ्याने पन्ना लालच्या मनात भरवलं की, पत्नी अनिता देवीला पुन्हा एक मुलगी होईल. मुलगा पाहिजे या विचाराने झापटलेल्या पन्नालालने पुजाऱ्याने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने ८ महिन्याने गर्भवती असलेल्या पत्नीचं पोट विळ्याने चिरलं. दरम्यान या घटनेनंतर जखमी झालेल्या अनिताला बुडाऊन पोलिसांनी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होतं.

तेथील डॉक्टरांना तिचा जीव वाचवण्यात यश आलं. मात्र लहान बाळ या हल्ल्यातून वाचू शकलं नाही. त्यानंतर पोलिसांनी पन्नालाल यांच्यावर कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न) आणि ३१३ (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी २०२१ मध्ये आरोपपत्र दाखल केलं .

आरोपीला मुलगा हवा होता

अनिताचा भाऊ रवी सिंग याने याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, पन्ना लालला आधीपासूनच मुलगा व्हावा, अशी इच्छा होती. पाच मुली असूनही पन्ना या चुकीच्या कल्पनेवर ठाम राहिला. जेव्हा अनिता सहाव्यांदा गरोदर राहिली तेव्हा पन्नाने तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. ती परत मुलीलाच जन्म देणार असल्याने तिने गर्भपात करावं, असं पन्नालाल तिला सांगत होता. अनिता मात्र तिच्या भूमिकेवर उभी राहिली आणि न जन्मलेल्या मुलाचे रक्षण करण्याचा निर्धार तिने केला.

दरम्यान न्यायालयात हा खटला उभा राहिला तेव्हा आरोपी पतीने हे अपघातने झालं असल्याचं म्हटलं. परंतु सरकारी वकिलांनी कोर्टात हा घातपातच असल्याचा युक्तीवाद लावून धरला. पन्नालालला दोषी ठरविण्यासाठी न्यायालयाने सक्तीचे पुरावे आणि अनिताचा जबाब ग्राह्य धरला. न्यायालयाने पन्ना लाल याला जन्मठेपेची शिक्षा झाली. तसेच त्याला ५०,००० रुपयांचा रोख दंड न्यायालयाने ठोठावला. पन्ना लालला दोषी ठरवताना न्यायमूर्तींनी काही निर्दश नमूद केले, या गुन्ह्याचा परिणाम केवळ वैयक्तिक पीडितच नाही तर समाजावरही झाला असल्याचं न्यायालयाने आपला निर्णय देताना नमूद केलं.

UP Crime: पुजाऱ्यानं डोकं फिरवलं, गर्भवती पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य; नराधम पतीला जन्मठेपेची शिक्षा
Jalna Crime News: भयानक! प्रेमी युगुलानं संपवलं जीवन; कारण अजून समजेना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com