Catch Partner Lying : लाईफ पार्टनर आपल्याशी खोटं बोलत आहे, कसं ओळखायचं? वाचा टिप्स

Lying Partner : पार्टनर बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला फसवत आलेला असतो आणि मग अचानक एक दिवस हे सत्य आपल्या समोर येतं. त्यामुळे आज पार्टनर खोटं बोलत आहे हे कसं ओळखायचं ते जाणून घेऊ.
Lying Partner
Catch Partner LyingSaam TV

प्रत्येक व्यक्ती आपल्या नात्यात आपल्या जोडीदाराकडून सत्य आणि निर्मळ मनाने राहण्याचा विचार करत असतो. मात्र प्रत्येकालाच चांगलाच पार्टनर मिळतो असे नाही. आपण कितीही चांगले असलो तरी काहीवेळा आपल्याला खोटं बोलणारे पार्टनर मिळतात.

Lying Partner
Killing Live-In Partner: प्रेयसीच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून हत्या; धक्कादायक घटनेनं बेंगळुरु हादरलं

अनेकदा पार्टनरकडून धोका मिळतो, ही फसवणूक अचानक झालेली नसते. पार्टनर बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला फसवत असतो आणि मग अचानक एक दिवस हे सत्य आपल्या समोर येतं. त्यामुळे आज पार्टनर खोटं बोलत आहे हे कसं ओळखायचं ते जाणून घेऊ.

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

अनेकदा पार्टनर आपल्याशी खोटं बोलत असेल किंवा काही चुकीचं काम केल्याने ते आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा हातवारे करून बोलतात. जेव्हा आपण त्या विषयावर बोलत असतो तेव्हा वेगळा टॉपिक काढतात आणि तो विषय टाळतात. अशावेळी तुमचा पार्टनर खोटं बोलत आहे हे समजून जा.

कपाळावर घाम येणे

खोटं बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावर घाम येतो. जेव्हा तुम्ही पार्टनरजवळ असता त्याच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो घाबरतो. आपण लपवून ठेवलेली गोष्ट समजली की काय अशी भावना सतत त्याच्या मनात असते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कपाळावर घाम येतो.

नजर न मिळवणे

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करत असाल तर तो तुमच्याशी संवाद साधताना नजरेला नजर मिळवत नाही. दुसरीकडे पाहून किंवा तुमच्या डोळ्यांत न पाहता संवाद साधतो. अशावेळी पार्टनर तुमच्याशी खोटं बोलत आहे हे समजून जा.

घसा कोरडा पडणे

ज्या व्यक्ती जास्त खोटं बोलतात त्यांना फार भीती वाटते. महत्वाचं म्हणजे आई-वडिलांपेक्षाही आपल्या पार्टनरसमोर खोटं बोलताना व्यक्ती फार घाबरतात. त्यामुळे त्यांचा घसा लगेच कोरडा पडतो. त्यांना काही बोलता येत नाही. तुमच्या लाईफ पार्टनरच्या वागण्यातही असाच बदल जाणवत असेल तर खोटं बोलत आहे हे समजून जा.

Lying Partner
डेट करताय? कसे ओळखाल समोरचा व्यक्ती ‘Perfect Life Partner’ आहे?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com