Killing Live-In Partner: प्रेयसीच्या डोक्यात प्रेशर कुकर घालून हत्या; धक्कादायक घटनेनं बेंगळुरु हादरलं

Killing Live-In Partner With Pressure Cooker: बेंगळुरु येथून देखील काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आलीये.
Killing Live-In Partner
Killing Live-In PartnerSaam Tv

Bengaluru:

आजकाल अनेक तरुण मुलं मुली प्रेमात पडतात आणि लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. दोघेही कुटुंबापासून दूर एकटे राहत असल्याने त्यांच्यात होणाऱ्या वादाला त्यांनाच सामोरे जावे लागते. लिव्ह इन रिलेशनमधील अनेक धक्कादायक घटना आजवर समोर आल्या आहेत. श्रद्धा वालकर प्रमाणे अनेक घटना घडत आहेत. अशात बेंगळुरु येथून देखील काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आलीये. (Latest Marathi News)

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यात वाद झाल्याने तरुणीच्या डोक्यात प्रेशर कुकर मारुत तिची हत्या करण्यात आली आहे. बेंगळुरुमध्ये शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वैष्णव असं आरोपीचं नाव असून पीडिता देवीवर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात देवीचा जागीच मृत्यू झालाय.

Killing Live-In Partner
Mumbai Crime News: मुंबईत 20 किलो गांजा जप्त, पाच जणांना बेड्या; अंधेरी पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवीच्या बहिणीने तिला शनिवारी कॉल केला होता. बरेच कॉल केले तरी देवी फोन उचलत नव्हाती. त्यामुळे बहिणीने देवीच्या शेजाऱ्यांना कॉल करुन देवीकडे देण्यास सांगितलं. शेजारी जेव्हा देवीच्या घरी गेले तेव्हा वैष्णवने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली. तसेच घरातही येऊ दिले नाही.

यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून घराची पाहाणी केली असता आणि वैष्णवची कसून चौकशी केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Killing Live-In Partner
Pune Crime News: पैशाचा वाद विकोपाला गेला... मित्रांनीच मित्राचा काटा काढला; वाघोलीत खळबळ

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, देवी आणि वैष्णव हे दोघेही मुळचे केरळमधील आहेत. ते कॉलेजमध्ये असतानापासून एकमेकांच्या प्रेमात होते. पुढे त्यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुटुंबीयांना देखील याबाबात माहिती होते. देवी आणि वैष्णव दोघांमध्येही सतत वाद व्हायचे. शनिवारी वाद विकोपाला गेला आणि देवीला आपला जीव गमवावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com