Pune Latest News
Pune Latest NewsSaamtv

Pune Crime News: पैशाचा वाद विकोपाला गेला... मित्रांनीच मित्राचा काटा काढला; वाघोलीत खळबळ

Pune Latest News: वाघोली परिसरात पैशाच्या कारणावरुन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Wagholi Crime News: पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील वाघोली परिसरात पैशाच्या कारणावरुन मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Crime News In Marathi)

Pune Latest News
Dhananjay Munde News: बीडकरांचं अजित पवारांवरील प्रेम उद्या दिसेल; मंत्री धनंजय मुंडे सभेआधी नेमकं काय म्हणाले? वाचा

याबाबत अधिक माहिती अशी की, राम सुभाष श्रीरामे मंडगीकर, गोपाल कोतलापुरे आणि शैलेंद्र मंडगीकर हे तिघेही मित्र होते. २ दिवसांपूर्वी ते दारू पिण्यासाठी ते एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडणे झाली.

भांडण इतके विकोपाला गेले की श्रीरामे मंडगीकर आणि गोपाल कोतलापुरे या दोघांनी शैलेंद्र मंडगीकर याचा खून केला. हत्येनंतर दोघेही घटनास्थळावरुन पळून गेले. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा तपास सुरू केला. (Pune Crime)

Pune Latest News
Borivali National Park News: बोरीवली नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेले, ओढ्यामध्ये मित्रांसोबत मस्ती करताना २५ वर्षांचा तरुण गेला वाहून

पोलीस आरोपींचा शोध घेत असताना त्यांना श्रीरामे हा तुळजापूर येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार एक पथक तेथे पोहचले व सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याचा दुसरा मित्र कोतलापुरे याला वाघोलीमधून अटक करण्यात आली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com