Borivali National Park News: बोरीवली नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेले, ओढ्यामध्ये मित्रांसोबत मस्ती करताना २५ वर्षांचा तरुण गेला वाहून

Man Drowning In Waterfall At Borivali: ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात अचानक वाढ झाली. या पाण्याच्या प्रवाहासोबत चंदन वाहून गेला.
Man Drowning In Waterfall At Borivali
Man Drowning In Waterfall At BorivaliSaam Tv

संजय गडदे, बोरिवली

Mumbai News: मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सध्या मुळधार पाऊस (Heavy Rain In Mumbai) पडत आहे. पावसाळ्यामध्ये फिरण्यासाठी अनेक जण पर्यटनस्थळी जातात. मुंबईजवळ असलेल्या बोरीवली नॅशनल पार्कमध्ये (Borivali National Park) अनेक जण पावसाचा आनंद घेण्यासाठी जातात. अशामध्येच या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. नॅशनल पार्कमध्ये मित्रांसोबत फिरण्यासाठी आलेला एक तरुण ओढ्यामध्ये वाहून गेला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

Man Drowning In Waterfall At Borivali
Breaking News: शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांना जाहीर केला पाठिंबा

मिळालेल्या माहितीनुसार, चंदन दिलीप शाहा (२५ वर्षे) असं ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. चंदन शाहा बारीक पायरी क्रांतीनगर परिसरातील रहिवासी आहे. बुधवारी तो आपल्या मित्रांसोबत बोरीवली पूर्वेला असलेल्या नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी आला होता. याचवेळी नॅशनल पार्कमधील ओढ्यामध्ये तो मित्रांसोबत मस्ती करत होता. त्याचवेळी ओढ्याला आलेल्या पूराच्या पाण्यात अचानक वाढ झाली. या पाण्याच्या प्रवाहासोबत चंदन वाहून गेला.

Man Drowning In Waterfall At Borivali
Raigad Khalapur Irshalgad Landslide News: मुख्यमंत्र्यांकडून मदत, बचावकार्याचा आढावा, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

बुधवारी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ओढा ओलांडत असताना चंदनचा पाय घसरून तो पुराच्या पाण्यात पडला आणि वाहून गेला असे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने चंदनचा शोध सुरु केला. पण मुसळधार पाऊस आणि अंधार असल्यामुळे त्यांना शोध मोहीमेमध्ये अडथळा येत होता. शेवटी अंधार झाल्यामुळे त्यांनी शोधमोहीम थांबवली होती. पुन्हा त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Man Drowning In Waterfall At Borivali
FIFA Women's World Cup 2023: न्यूझीलंडमध्ये ओपनिंग मॅचपूर्वीच नॉर्वे संघाच्या हॉटेलवर फायरींग! दोघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

दरम्यान,काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वांद्रे येथील समुद्रकिनाऱ्यावर कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. मुंबईच्या बँडस्टँड किनाऱ्याजवळ पतीसोबत सेल्फी काढत असताना अचानक मोठी लाट आली. या लाटेसोबत ही महिला वाहून गेली. या घटनेत महिलेचा पती बचावला. पण ती समुद्रात वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. ज्योती सोनार असं या महिलेचे नाव होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com