Thane Crime News: आधी एकतर्फी प्रेम , मग संशय ! प्रशिक्षकानेच केली १७ वर्षीय कबड्डीपटूची हत्या

Mumbai Crime News: ठाणे शहरात एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे,ज्यात एका कबड्डी प्रशिक्षकाने कबड्डीपटूची संशयातून हत्या केली आहे.
Crime News
Thane NewsSaam tv

ठाणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १७ वर्षीय कबड्डीपटूची तिच्या प्रशिक्षकाने गळा दाबून धारधार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेश (वय २३) या प्रशिक्षकास अटक केली आहे. मात्र या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News
Dhule Crime : धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी गणेशने अल्पवयीन मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. गणेश तिच्यावर अनेक दिवसांपासून प्रेम करत होता. त्या दिवाशी ती इतर कोणाशी मोबाइलवर बोलते,असा गणेशला संशय आला, यावरुन गणेशला राग आला असता त्याने तिची निघृण हत्या केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले

मृत १७ वर्षीय मुलगी आपल्या आई आणि भावासोबत ठाणे शहरातील कोलशेत(kolshet) येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होती. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, घटनेच्या काही दिवस आधी मुलीची आई आणि भाऊ त्यांच्या गावी गेले होते. त्यानंतर रविवारी मुलीच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी मुलीच्या घरमालकांना याबाबत सांगितले. घरमालकाने येऊन दरवाजा उघडला असता १७ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांनी याबाबात कळवले त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना याबाबत कल्पना दिली आणि तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मृत १७ वर्षीय मुलीला आधीपासूनच कबड्डी खेळण्याची आवड होती. आवड असल्याने कबड्डी(kabbadi)मध्येच करियरही करण्याची तिची इच्छा होती. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळलेल्या आरोपी गणेशकडे तिने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. गुरूवार २३ मे रोजी सकाळी मुलगी एकटी आणि तिच्या घरात कोणी नसल्याचे त्याला समजले.

याच संधीचा फायदा घेत गणेश तिच्या घरी आला. दरम्यान ती इतर कोणाशी फोनवर बोलत होती, असा गणेशला संशय आला होता. या कारणावरुन गणेश आणि तिच्याच वाद झाला. मात्र हा गणेशला राग सहन न झाल्याने तिचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळला त्यानंतर तिच्या गळ्याभोवती कात्रीने वारही केले. मात्र हत्येनंतर गणेशने तिच्या घराचा दरवाजा ओढून पळ काढलाचे पोलिस तपासात समोर आले.

Crime News
Ahmednagar Crime: 'माझ्या नवऱ्याला मेसेज का करतेस?', डॉक्टर महिलेकडून नर्सला बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी; नगरमधील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com