Dhule Crime : धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात

Dhule News : नंदुरबार जिल्ह्यातील उंभर्टी येथे वास्तव्यास असलेली पीडित महिला आपल्या मुलासह सटाणा येथे कांद्याच्या गोडाऊनवर मजुरीच्या कामासाठी गेली होती
धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात
Uttarakhand Girl Gang rapeSaam TV

धुळे : मजुरीसाठी आलेल्या महिलेला कामावरून घरी परतण्यास उशीर झाला. यामुळे मार्केट परिसरात थांबलेल्या महिलेवर दोघा नराधमांनी अत्याचार केल्याची घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे घडली. या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात
Nashik News : उद्यानात खेळण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाची धडक; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील उंभर्टी येथे वास्तव्यास असलेली पीडित महिला आपल्या मुलासह सटाणा येथे कांद्याच्या गोडाऊनवर मजुरीच्या कामासाठी गेली होती. दरम्यान तेथून परत गावी जातांना रात्री उशीर झाल्यामुळे महिलेस गावी परतण्यासाठी वाहन मिळाले नाही. यामुळे सदर महिला हि मुलासह पिंपळनेर येथील मार्केट कमिटी आवारात थांबली होती. महिला एकटी असल्याची संधी साधून मार्केट (Crime News) कमिटी कार्यालयाच्या ओट्यावर दोघा नराधमांनी महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला. 

धुळे हादरले..कामावरून घरी परतताना महिलेवर दोघांकडून अत्याचार; दोघे पोलिसांच्या ताब्यात
Akola News : कापसाचे बियाणे म्हणजे चॉकलेट आहे का?; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्याला अजब उत्तर

या संदर्भातील माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी (Police) तात्काळ या दोघांना अटक केली असून, त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (Dhule) दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या घटनेमुळे रात्री प्रवासी महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com