Akola News : कापसाचे बियाणे म्हणजे चॉकलेट आहे का?; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्याला अजब उत्तर

Akola News : जादा उत्पन्न मिळत नसल्याने अजित १५५ या बियाण्याची मागणी अधिक होत आहे. मात्र कापसाचे बियाणे मिळत नाही. बियाणे मिळावे यासाठी शेतकरी कृषी केंद्राबाहेर सकाळपासून रांगेत उभे राहत आहे
Akola News
Akola NewsSaam tv

अक्षय गवळी 
अकोला
: कापसाचे बियाणं बाजारात मिळत नसल्याने अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. एकीकडे कापसाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल सुरु आहेत. याचवेळी अकोल्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार आणि असंवेदनशीलपणा समोर आला आहे. 

Akola News
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा फटका; जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात मोठे नुकसान

जादा उत्पन्न मिळत नसल्याने अजित १५५ या बियाण्याची मागणी अधिक होत आहे. मात्र कापसाचे बियाणे मिळत नाही. बियाणे मिळावे यासाठी शेतकरी कृषी केंद्राबाहेर सकाळपासून रांगेत उभे राहत आहे. दरम्यान आज कृषी केंद्र उघडण्यात न आल्याने शेतकरी संतप्त झाले व रस्त्यावर उतरले होते. हे बियाणे मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मात्र अतिशय उद्धटपणे उत्तर दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

Akola News
Nashik News : उद्यानात खेळण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाची धडक; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

काय म्हणाले अधिकारी शेतकऱ्याला 
दरम्यान शेतकरी गोपाल ठाकरे यांनीं जिल्हा कृषी अधिकारी यांना फोन लावून बियाणे मिळत नसल्याची तक्रार केली. अजित १५५ च्या बॅगा पाहिजे होत्या अशी मागणी केली. मात्र कुठेच बॅगा नाहीत. काल पूर्ण विक्री होऊन आटोपल्या असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण आम्हाला बियाणं पाहिजे ना साहेब असे शेतकऱ्याने म्हणताच कृषी अधिकारीने अहो बियाणं काय आपल्या चॉकलेटसारखं आहे का?; आपण तयार करू, उत्पादन करू. आठ महिने लागतात उत्पादन करायला; असे उत्तर शेतकऱ्याला दिले. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com