Nashik News : उद्यानात खेळण्यासाठी जाताना अज्ञात वाहनाची धडक; ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

Nashik News : उद्यानात खेळण्यासाठी जात असताना वाहनाने चिमुकल्याला उडविले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले
Nashik News
Nashik NewsSaam tv

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : सुट्या असल्याने सायंकाळ झाली कि, जवळच्या उद्यानात खेळण्यासाठी मुलं जातात. दरम्यान उद्यानात खेळण्यासाठी जात असताना वाहनाने चिमुकल्याला उडविले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  

Nashik News
Akola Accident : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जीव गमावला; बसच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिकच्या (Nashik) येवला शहरातील विठ्ठलनगर भागात २७ मे ला संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. उद्यानात खेळण्यासाठी जात असलेल्या पाच वर्षीय रुद्र समाधान पागीरे या चिमुरड्याला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रुद्रला परिसरातील नागरीकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रकृती खालावत असल्याने त्याला अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचारा दरम्यान आज सकाळी त्याचा (Death) मृत्यू झाला. 

Nashik News
Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा फटका; जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यात मोठे नुकसान

वाहन चालकाचा शोध सुरु 

या संपुर्ण घटनेने विठ्ठल नगर परिसर हादरला असून चिमुकल्याला (Accident) धडक दिल्यानंतर वाहन चालक तेथून फरार झाला. यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या वाहनाचा शोध घेऊन वाहन चालका विरोधात कठोर कारवाईची मागणी परिसरातील संतप्त नागरीकांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com