Akola Accident : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात जीव गमावला; बसच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

Akola News : मागील दोन दिवसात अकोला जिल्ह्यात अपघाताची तिसरी घटना घडली असून या तिन्ही अपघातात ४ लोकांना आपला जिव गमवावा लागला
Akola Accident
Akola AccidentSaam tv

अक्षय गवळी 

अकोला : महामार्गावरून दुचाकीने जात असताना समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या बसखाली आल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला. 

Akola Accident
Wardha News : तुर बियाणांच्या दरात वाढ; प्रतिकिलो वाढले शंभर रुपये

अकोल्यातील (Akola) राष्ट्रीय महामार्गावरील नव्या किराणा बाजारजवळ हा अपघात घडला. प्रकाश पंचागे असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान अकोल्यात सातत्याने घडत असलेल्या अपघात डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे मागील दोन दिवसात अकोला जिल्ह्यात अपघाताची तिसरी घटना घडली असून या तिन्ही अपघातात ४ लोकांना आपला जिव गमवावा लागला. यामध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. तर ५ जण गंभीर स्वरुपात जखमी झाले. मागील १२ दिवसांतल्या घडलेल्या (Accident) अपघाती घटनेत अकोला जिल्ह्यात ९ लोकांचा मृत्यु झाला आहे.  

Akola Accident
Farmer Rasta Roko : कापूस बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक; अकोल्यात केला रास्तारोको

दरम्यान आज घडलेल्या घटनेत दुचाकीस्वार बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. प्रकाश पंचागे हा मूळ अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिवसेना वसाहत भागातील रहिवासी आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार एसटी बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला आहे. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com