कोमल दामुद्रे
ठाण्यात पहिल्यांदाच न्यूयॉर्कसारखा फिल घेता येणार आहे.
ठाण्यातील नमो ग्रँड सेंट्रल पार्क ही संकल्पना महाराष्ट्रात प्रथमच साकारली आहे.
या पार्कमध्ये ३,५०० पेक्षा जास्त झाडे लावण्यात आले आहेत.
या उद्यानातून दरवर्षी सुमारे ८.८ लाख ऑक्सिजन निर्माण होईल. तसेच या पार्कमध्ये विविध प्रजातींचे पक्षी आणि फुलपाखरे आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात २०.५ एकर जागेवर नमो ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे.
या पार्कमध्ये चार थीम पार्क आहे, मुलांसाठी फिटनेस आणि प्ले झोन, ४०० लोक बसू शकतील असे एक मोठे अॅम्फीथिएटर, एक एक्स-ब्रिज आणि ३१,००० स्क्वेअर फूटचे स्केटिंग पार्क आहे. जे लंडनमध्ये असलेल्या हायड पार्कच्या अनुकरणाने तयार केलेले आहे.
हे गार्डन सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत तर संध्याकाळी ४ ते रात्री ९ यावेळेत पर्यटकांसाठी खुले असणार आहे. सोमवारी बंद असेल.
१५ वर्षाखालील मुलांना कोणताही प्रवेश शुल्क नसेल तर प्रौढांना इतर दिवशी २० रुपये तर वीकेंडला ३० रुपये भरावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना १५ रुपये मोजावे लागतील.