कोमल दामुद्रे
जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि गार्निंग करण्यासाठी कोथिंबीरचा वापर केला जातो.
परंतु, कोथिंबीरपासून तुम्ही खुसखुशीत आणि खमंग अशी वडी बनवू शकता पाहूया रेसिपी
कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी बेसन आणि रवा एकत्र करा.
नंतर त्यात हळद, तिखट, धणेपूड, चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट आणि दही मिक्स करा.
त्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा. कढईत दोन चमचे तेल घालून गरम होऊ द्या.
नंतर त्यात जिरे, तीळ, हिंग, मोहरी आणि शेंगदाणे घालून परतून घ्या.
वरील सर्व साहित्य एकत्र करुन त्यात बेसन आणि रव्याचे पीठ घालून शिजवून घ्या.
त्यानंतर हे पीठ एका प्लेटमध्ये काढून चौकोनी आकार द्या आणि थंड होऊ द्या.