Health Tips  SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : सतत केसांचा अंबाडा बांधून ठेवताय? वेळीच व्हा सावधान! आरोग्यावर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

Shreya Maskar

केस मोठे असो वा लहान स्त्रियांना केस बांधण्याचे टेशन नेहमी असते. त्यामुळे बरेच वेळा महिला साधासोपा केसांचा अंबाडा घालतात. आजकाल घर असो वा बाहेर महिला केसांच्या बन मध्येच दिसतात. कारण ही हेअरस्टाईल झटपट तर होते तसेच यात चेहऱ्याचे सौंदर्य देखील खुलून येते. पण सतत केसांचा उंच आणि घट्ट अंबाडा बांधून ठेवल्यास डोक्याच्या आणि केसाच्या आरोग्याला नुकसान होते.

सतत केसांचा अंबाडा बांधून ठेवण्याचे दुष्परिणाम

डोकेदुखी

केसांचा सतत अंबाडा बांधून ठेवणे आरोग्यास घातक ठरते. यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. हे हेअर बन मज्जातंतूना हानी पोहचवतात. कारण आपण आपण डोक्यावर मध्यभागी अंबाडा घालतो.

डोक्याच्या शिरा सुजतात

अंबाडा घातल्यास आपल्याला केसांचा त्रास तर होत नाही. पण डोक्याच्या नसांमध्ये वेदना वाढतात. तसेच नसांना सूज येते. डोळ्यांचे आरोग्यही धोक्यात येते. कारण अंबाडा बांधताना केस खेचले जातात.ज्यामुळे डोळ्यांच्या नसा दुखतात.

रक्ताभिसरण

केसांचा घट्ट बन बांधल्यास टाळूमध्ये रक्ताभिसरण होताना मर्यादित येतात. ज्यामुळे केस पातळ होतात. तसेच केस गळतीचा त्रास सुरू होतो.

केसांचे आरोग्य धोक्यात

केस बराच वेळ बांधून ठेवल्याने केसांचा गुंता होतो. तसेच केसांची मूळ कमकुवत होतात. मोठ्या प्रमाणात केस तुटू लागतात. सतत केसांचा घट्ट अंबाडा बांधून ठेवल्यास केसांवर ताण येतो आणि केस गळतात. तसचे कपाळाच्यावरची हेअरलाईन विरळ होत जाते. केसांना बांधलेल्या रबरबॅण्डमुळे केस मोठ्या प्रमाणात तुटतात. तसेच केस ओलेही राहतात. त्यामुळे थोडा वेळ मोकळे केस सोडणे गरजेचे आहे.

केसांचा अंबाडा बांधण्याचे फायदे

कधीतरी केसांचा बन बांधणे हेअरस्टाईलच्या दृष्टीने चांगले आहे. कारण केसांचा बन बांधल्यास तुमचे सौंदर्य अजून खुलते. चेहरा आखीव रेखीव दिसू लागतो. त्यामुळे कधीतरी उंच हेअर बन बांधण्यास काही हरकत नाही. साडीवर उंच हेअर बन बांधल्यास तुमचा लुक सुंदर दिसतो.

केसांचा अंबाडा बांधताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • सतत केसांचा घट्ट अंबाडा बांधू नये.

  • उंच अंबाडा घातल्यास डोक्यावर अतिरिक्त दबाव येतो.ज्यामुळे डोक्याचे आरोग्य धोक्यात येते.

  • केसांचा बन बांधायची इच्छा होत असल्यास डोक्याच्या खालच्या भागी सैल बन बांधावा.

  • अंबाडा बनवताना जास्त केस ओढले जाणार नाही याची काळजी घ्यावी.

  • डोक्यावर सतत एकाच ठिकाणी अंबाडा बनवू नये. कारण मग ती जागा दुखू लागते.

  • केसांचा अंबाडा बांधण्यासाठी चांगल्या रबर बँड आणि क्लिपचा वापर करा. जास्त घट्ट हेअर क्लिपचा वापर करू नये. कारण हेअर अ‍ॅक्सेसरीज केसांचे आरोग्य धोक्यात आणतात.

    डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladaki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' कधीच बंद होणार नाही, PM मोदींसमोर मुख्यमंत्र्यांनी दिली गॅरंटी

Mangal Gochar: दिवाळीपूर्वीच काही राशींचं चमकणार नशीब; दिवाळीच्या १० दिवसांपूर्वी मंगळ देणार भरपूर पैसे- सुख

PM Modi Speech : समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, काँग्रेसपासून सावध राहा; वाशिमच्या सभेतून PM मोदींचा घणाघात

Coconut Water: रोज नारळ पाणी पिताय तर सावधान! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

Marathi News Live Updates : काँग्रेस गरिबाला अजून गरीब करत आहे - PM मोदी

SCROLL FOR NEXT