Shreya Maskar
रोजच्या धावपळीत न विसरता स्किन केअर करा. यामुळे चेहऱ्याची त्वचा दीर्घकाळ चांगली राहते. तसेच कोणताही संसर्ग होत नाही. रात्री झोपण्यापूर्वी स्किन केअर करणे गरजेचे आहे.
स्लीपिंग मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये कोरफड जेल, गुलाब पाणी , व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. जेल पांढरे होईपर्यंत चांगले मिक्स करा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने स्वच्छ करून त्यावर तयार स्लीपिंग मास्क लावा आणि निवांत झोपी जा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.
मास्क लावून चेहऱ्यावर ५-१० मिनिटे चांगले मालिश करा. सकाळी उठल्यावर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा आणि त्याला मॉइश्चराइझर लावा.
आठवड्यातून दोन वेळा हा स्लीपिंग मास्क चेहऱ्यावर लावल्याने चेहरा हायड्रेट आणि चमकदार बनतो. छोट्या घरगुती उपायाने तुम्हाला ग्लोइंग त्वचा मिळेल.
चेहर्याची जळजळ होत असेल तर हे स्लीपिंग मास्क आवर्जून लावा. यामुळे त्वचेवरील लालसरपणा कमी होतो. तसेच चेहरा निरोगी राहतो.
कोणतेही स्किन केअर चेहऱ्यावर करण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट न विसरता करा. कारण पदार्थ नैसर्गिक जरी असले तरी प्रत्येकाच्या त्वचेला फायदेशीर ठरतील असे नाही. कारण काहींची त्वचा जास्त संवेदनशील असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.