Shreya Maskar
खूप मुलींची आणि महिलांची अशी तक्रार असते की, मी साडीत जाड दिसते. त्यामुळे त्या साडी जास्त नेसत नाही किंवा टाळतात. साडीत तुम्हाला बारीक दिसायचे असेल तर ब्लाउज पॅटर्न योग्य निवडा.
साडीमध्ये बारीक दिसायची असेल तर ब्लाउजची निवड करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. उदा. रंग, उंची, साडीचा रंग, साडीचा कपडा, साडीवरील वर्क
जर साडीमध्ये तुम्ही जाड दिसत असाल तर, ब्लाउजचा गळा व्ही शेप नेक, चौकोनी गळा, बोट नेक किंवा मागच्या बाजूने बंद गळ्याचा शिवा. यामुळे तुम्ही उंच आणि स्लिम दिसाल.
आजकाल फ्लावर प्रिंटचा ट्रेंड पाहायला मिळतो. त्यामुळे ब्लाउजच्या बाह्यांवर सुंदर फुलांची डिझायन असायला हवी. ज्यामुळे तुम्ही थोडे उंच दिसाल तसेच तुम्हाला आवडत असेल तर हाताच्या कोपऱ्यापर्यंत ब्लाउजची लांबी ठेवा.
फुल स्लीव्ह्ज बाह्यांमध्ये महिला स्लिम दिसतात. दंड जाड असतील तर मेगा स्लीव्ह्ज, पफ स्लीव्ह्ज असणारे ब्लाउज घालणे टाळा.
ब्लाऊजचा कपडा कधीकधी फुगतो ज्यामुळे आपण जास्त जाड दिसतो. म्हणूनच ब्लाउजचा शिवण्यासाठी फुगणारा कपडा घेऊ नका. तर सिल्क, शिफॉन, जॉर्जेट, क्रेप कपड्याचा ब्लाउज शिवा.
ब्लाउजची फिटिंग हा देखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे तिथे विशेष लक्ष द्या. तसेच बारीक दिसण्यासाठी उभे पॅटर्न आणि बारीक प्रिंट असलेला ब्लाउज निवडा.
साडीत बारीक दिसण्यासाठी गडद रंगाचे, हलके ब्लाउज निवडा. ब्लाउजचा रंग निवडताना तुम्ही तुमचा स्किन टोन देखील लक्षात घ्या. म्हणजे परफेक्ट ब्लाउज शिवता येईल.