Skincare Tips : ५ मिनिटांत चमकदार त्वचा हवीय? स्टेप बाय स्टेप फॉलो करा 'हे' स्किन केअर रूटीन

Shreya Maskar

स्किन केअर

रोजच्या धावपळीत आपण स्कीन केअरकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ५ मिनिटांत स्किन केअर कसे करायचे जाणून घेऊयात. सिंपल रूटीन रोज फॉलो करा. ज्यामुळे चेहरा देखील निरोगी राहील.

Skincare Routine | yandex

थंड पाण्याने चेहरा धुवा

स्किन केअरची पहिली पायरी म्हणजे, चेहरा थंड पाण्याने धुवा. थंड पाण्यामुळे त्वचेत रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे ती लगेच ताजी दिसते. तसेच तुम्ही चेहऱ्यावर कापड्यात गुंडाळून बर्फ चोळा. यामुळे सूज कमी होते आणि नैसर्गिक चमक येते.

Skincare Routine | yandex

चेहार मॉइश्चरायझ करा

हिवाळ्यात त्वचा पटकन कोरडी होते. त्यामुळे त्वरित मॉइश्चरायझर लावा. तुम्ही जेल मॉइश्चरायझर लावू शकता. कोणत्याही चिकटपणाशिवाय नैसर्गिक चमक मिळते. मॉइश्चरायझर तुमचा चेहरा निरोगी देखील बनवू शकतो.

Skincare Routine | yandex

डोळ्यांची काळजी

डोळ्यांभोवतीची त्वचा सर्वात आधी थकलेली दिसते. जर डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सूज आली असेल तर ५ मिनिटे थंड काकडीचे तुकडे ठेवून द्या. त्यानंतर आय क्रीम लावा. ज्यामुळे डोळे उजळतील.

Skincare Routine | yandex

ओठांना मॉइश्चरायझ करा

कोरडे आणि फाटलेल्या ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम लावा. तसेच गुलाब तेल देखील लावू शकता. यामुळे ओठ मुलायम होतात.

Skincare Routine | yandex

फेस मसाज

आता चेहऱ्याला ४-५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. कोणतेही हलके फेस ऑइल किंवा सीरम घ्या आणि वरच्या दिशेने मसाज करा. यामुळे त्वचा घट्ट होते आणि झटपट चमक येते.

Skincare Routine | yandex

ब्लश किंवा टिंट

चेहरा आणखी उजळ आणि फ्रेश ठेवण्यासाठी गालांवर हलका क्रीम ब्लश किंवा टिंट लावा. बाहेर जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी किंवा डिटॉक्स वॉटर प्या. चेहऱ्यावर चमक आणण्यात हायड्रेशन महत्त्वाची भूमिका बजावते.

Skincare Routine | yandex

हेअर केअर

तेलकट किंवा सपाट केस तुमचा लूक खराब करू शकतात. त्यामुळे बाहेर जाण्यापूर्वी केसांना हलका हेअर सीरम लावा आणि केस ओपन ठेवा. एक स्टायलिश लूक येईल.

Hair Care | yandex

NEXT : संत्र्याची साल फेकू नका, असं तयार करा सीरम, त्वचा आरशासारखी चमकेल

Orange Peel Homemade Serum | saam tv
येथे क्लिक करा...