Shreya Maskar
घरीच व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी संत्र्याची साल, लिंबाची साल, पपईची साल, कोरफड जेल, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल इत्यादी साहित्य लागते.
व्हिटॅमिन सी सीरम बनवण्यासाठी सर्वप्रथम संत्री, लिंबू आणि पपईची साले खूप थंड पाण्यात एक तास भिजवा. त्यानंतर त्यात थोडे पाणी टाकून एक उकळी काढून घ्या.
भांड्याच्या तळाशी संत्र्याचा घट्ट गर दिसेपर्यंत पाणी उकळवा. त्यानंतर पाणी गाळून त्यात उरलेले संत्र्याचा गर बाजूला काढा.
संत्र्याचा गर थंड झाल्यावर एका बाऊलमध्ये घ्या आणि त्यात कोरफड जेल, ग्लिसरीन, बदाम तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून सर्व मिक्स करून घ्या. अशाप्रकारे संत्र्याची सालीपासून व्हिटॅमिन सी सीरम तयार झाले.
तुम्ही हे सीरम जास्तीत जास्त 2 आठवड्यांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता. जर त्याचा रंग तपकिरी झाला किंवा विचित्र वास येऊ लागला तर ते अजिबात वापरू नका.
व्हिटॅमिन सी सीरम नियमितपणे वापरल्यास त्वचा उजळ होईल. काळे डाग हळूहळू कमी होतील. कोलेजन वाढेल, ज्यामुळे तुमची त्वचा तरुण दिसते.
सीरममुळे त्वचेला हायड्रेट आणि मऊ-मुलायम राहते. टॅनिंग कमी होते. तुमचा चेहरा नैसर्गिकपणे चमकू लागतो.
कोणतीही गोष्ट नैसर्गिक जरी असली तरी काहीही वापरण्यापूर्वी नेहमीच पॅच टेस्ट करा. जर तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.