Shreya Maskar
तुम्हाला पैठणी साडी जास्त भरलेली असेल तर यावर साधे-सिंपल आणि सोनेरी रंगाचे ब्लाउज निवडा. यावर मण्यांचे वर्क असेल तर खूपच सुंदर वाटेल.
पैठणी ब्लाउजचे डिझाइन पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा संगम असावा. यात बोट नेक, हाय नेक, पफ स्लीव्ह्ज यांचा समावेश करा.
ब्लाउजमध्ये तुम्ही झरी बॉर्डर, नेट किंवा बॅकलेस डिझाईन्स वापरू शकता. लग्न समारंभासाठी हा लूक शोभून दिसेल.
पैठणी साडीमध्ये रंगांना खूप महत्त्व असते. पैठणी ब्लाउजचे मुख्य आकर्षण हात असतो. त्यामुळे सुंदर बारीक नक्षीकाम आणि फुलांचे डिझाइन असलेला ब्लाउज निवडा.
पैठणीच्या काठाशी जुळणाऱ्या खणाच्या कापडाचे ब्लाउज सध्या खूप ट्रेंड करतात. ज्यामुळे तुमचा लूक खूप मॉडर्न दिसतो.
तुम्ही एखादा सिंपल ब्लाउज खरेदी करून त्यावर हाताने वर्क करू शकता. साडीच्या रंगानुसार एम्ब्रॉयडरी करा. यामुळे रंगसंगती खूप उठून दिसेल.
पैठणी साडीवर बारीक मोती, वेगवेगळ्या रंगाचे मणी, मिरर वर्कचे ब्लाऊज सुंदर दिसतील. तुम्ही नेट ब्लाउजचा देखील यात समावेश करू शकता.
रॉयल पैठणी साडीवर ब्लाउजच्या पाठीमागे मोराची सुंदर डिझाइन करा. त्यामुळे पाठीची शोभा वाढते आणि साडी देखील शोभून दिसते.