Shreya Maskar
आपण अनेक पदार्थ कुकरमध्ये शिजवतो. मात्र आपली कायम तक्रार असते की, पदार्थ कच्चा राहिला. त्यामुळे कोणता पदार्थ किती कुकरच्या शिट्ट्यांमध्ये शिजतो जाणून घेऊयात.
प्रेशर कुरकमध्ये कोणताही पदार्थ शिजवताना धान्य शिजवण्याची वेळ, पाण्याचे प्रमाण, गॅसची आच या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
डाळ शिजवतना 2 -3 शिट्ट्या , राजमा किंवा शेंगा शिजवताना 4-6 शिट्ट्या आणि चणे शिजवताना 4 -5 कुकरच्या शिट्ट्या कराव्यात.
पालेभाज्या 1-2 शिट्ट्यांमध्ये शिजतात. बटाटा शिजायला 3-4 शिट्ट्या लागतात. बटाटा कधीही सालीसकट शिजवावा.
सर्व साधारणपणे कुकरमध्ये भात 2-3 शिट्ट्यांमध्ये शिजतो. मात्र जाड तांदळासाठी4-5 शिट्ट्या लागू शकतात. त्यामुळे तांदळाचा प्रकार लक्षात घ्या.
शिट्ट्यांची संख्या कुकरचा प्रकार, आकार, उष्णता, पाण्याचे प्रमाण आणि पदार्थ यावर अवलंबून असते.
पहिली शिट्टी झाल्यावर गॅसची आच नेहमी कमी करा. गॅस बंद केल्यावर कुकर लगेच उघडू नका. कुकर पूर्ण थंड होऊ दे मगच उघडा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.