Shreya Maskar
पार्लरमध्ये जाऊन 1000-1500 रुपये घालवण्यापेक्षा घरीच घरगुती पद्धतीने फेशियल करा. ज्यामुळे तुमचा चेहरा आरशासारखा चमकेल.
फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे क्लींजिंग. यामुळे चेहरा स्वच्छ होतो. दुधात ग्लिसरीन मिक्स करून कॉटन पॅडने चेहऱ्याला लावा. ५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.
फेस पॉलिश करण्यासाठी एका बाऊलमध्ये कॉफी पावडर, मध आणि दूध चांगले मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटे झाल्यावर चेहरा स्वच्छ करा.
डेड स्किन काढण्यासाठी चेहऱ्याला स्क्रब करा. यासाठी एका बाऊलमध्ये बेसन, टोमॅटोची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा आणि चेहरा स्क्रब करा आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
त्यानंतर चेहऱ्याला वाफ द्या. यामुळे पोर्स ओपन होतील. चेहऱ्याला वाफ दिल्यामुळे त्वचा चमकण्यास मदत होते. तसेच त्वचा हायड्रेट राहते.
शेवटी एक फेसपॅक चेहऱ्याला लावा. यासाठी बाऊलमध्ये बीटरूटचा रस, तांदळाचे पीठ आणि कोरफड जेल मिसळा. तयार फेसपॅक 15-20 मिनिटे चेहऱ्याला लावा आणि त्यानंतर पाण्याने चेहरा धुवा.
चेहऱ्यावर एवढी मोठी प्रक्रिया केल्यावर चेहरा मॉइश्चरायझ करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे चेहऱ्याला भरपूर मॉइश्चरायझर लावा. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर निवडा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.