Shreya Maskar
कोणत्याही धान्याची भाकरी बनवण्यासाठी धान्या फ्रेश आणि चांगल्या दर्जाचे घ्या. तसेच ते वापरण्यापूर्वी स्वच्छ करायला विसरू नका.
भाकरी जेव्हा बनवायची असेल तेव्हाच पीठ दळून आणा. 15 ते 20 दिवसांपूर्वी दळलेले पीठ भाकरीसाठी वापरू नका. ते खराब होते.
ताज्या पीठामुळे भाकरी चांगली भाजली जाते. तसेच ती कडक होत नाही. आपण चपातीचे पीठ जास्त दिवसांपूर्वी दळलेले वापरू शकतो. पण भाकरीला नाही.
चपातीच्या पीठासारखे भाकरीचे पीठ 1-2 तास आधी मळून ठेवू नका. भाकरी बनवायच्या वेळी पीठ मळा.
भाकरी मळताना तेला ऐवजी तुपाचा वापर करा. यामुळे भाकरी मऊ होते. तसेच पोषण देखील चांगले मिळते.
भाकरीचे पीठ मळताना थंड किंवा गरम पाण्यापेक्षा कोमट पाण्याचा वापर करा. जेणेकरून चांगली उकड तयार होते. भाकरी तयार झाल्यावर जास्त वेळ टिकते.
भाकरी करताना चपाती सारखाच छोटा गोळा करा आणि हळूहळू हाताच्या साहाय्याने भाकरी थापा. तुम्ही हाताला कोरडे पीठ लावून घ्या.
भाकरी तव्यावर टाकली की पटकन उलटी करू नका. एक बाजू पूर्णपणे भाजली की ती टम्म फुगते मगच भाकरी उलटी करा. जेणेकरून भाकरी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजली जाईल.