Shreya Maskar
हिवाळ्यात चांगल्या त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेले प्रोडक्ट नेहमीच काम करतील असे नाही, त्यामुळे चांगल्या त्वचेसाठी आहार देखील महत्त्वाचा आहे.
बऱ्याच वेळा प्रोडक्टमध्ये असलेल्या रसायनांमुळे त्वचेला संसर्ग होतो. ज्यामुळे त्वचेचे आणखी नुकसान होते. अशा परिस्थितीत चांगल्या त्वचेसाठी फ्रेश फळांचे सेवन करा.
ब्लूबेरी अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. यातील पोषक घटक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. कोलेजन वाढवते, सुरकुत्या आणि काळे डाग यांसारख्या वृद्धत्वाच्या लक्षणे दिसत नाही.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करतात. सुरकुत्या, पिंपल्स आणि काळे डाग देखील कमी करतात.
द्राक्षे खाणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. ते वृद्धत्वाची लक्षणे लपवण्यास मदत करतात आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देते. तसेच चेहऱ्याची जळजळ देखील कमी करतात.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि टॅनिंग देखील कमी होते. त्यामुळे रोज एक संत्री खा.
काकडी ही त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे त्वचा हायड्रेट राहून तजेलदार बनते. तसेच काकडीचे स्लाइस चेहऱ्यावर, डोळ्यावर ठेवल्यास काळवंडलेली त्वचा कमी होते. तसेच चेहरा मऊ राहतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.