Shreya Maskar
तुम्ही मित्राला ट्रिमर मशीन गिफ्ट करू शकता. ऑनलाइन तुम्हाला स्वस्तात मस्त मिळेल. तुमचे मित्र खूपच हँडसम दिसतील.
तुम्ही एक कस्टमाइज गिफ्ट हॅम्पर देऊ शकता. यात बॉटल, पाकीट आणि कॉफी मग यांचा समावेश करा. तुम्ही या वस्तूंवर त्यांचे नाव देखील लिहू शकता.
मुलांना वॉच खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही एक छान घड्याळ गिफ्ट करा. न्यू इयर ऑफरमध्ये वॉच ऑनलाइन स्वस्तात मिळेल.
पाकीट मुलांच्या सोबत 24 तास असते. तसेच ते एक गरजेची वस्तू आहे. त्यामुळे त्यांना आवडेल असे, चांगल्या रंगाचे पाकीट गिफ्ट करा.
स्वस्तात मस्त गिफ्ट ऑप्शन म्हणजे परफ्यूम. तुम्ही चांगला, सुगंधी परफ्यूम मित्राला गिफ्ट करा. तो तुमची रोज आठवण काढेल.
गॉगल्स हा फॅशनमधील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे सुंदर ब्लू किंवा काळ्या रंगाचा गॉगल गिफ्ट करा. हे रंग सर्व आफटफिटवर चांगले जातील.
तुम्ही चांगल्या quotes किंवा चित्राचे मोबाईल कव्हर गिफ्ट करा. तुम्हाला कमी पैशांमध्ये चांगले मोबाईल कव्हर मिळतील.
मुलांना हुडी खूप आवडते. त्यामुळे तुम्ही ती गिफ्ट करू शकता. तसेच थंडीमध्ये हुडी हा फॅशनचा एक भाग आहे. तसेच तुम्ही फॅन्सी टी-शर्ट देखील गिफ्ट करू शकता.